पदोन्नतीची / वरिष्ठ वेतनश्रेणी लागु करुन , एकस्तर योजनेसह , प्रोत्साहन भत्ता , HRA अदा करणेबाबत परिपत्रक निर्गमित .दि.18.02.2025

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Circular regarding payment of incentive allowance, HRA along with single tier scheme, by applying promotion/senior pay scale ] : कर्मचाऱ्यांना पदोन्नतीची / वरिष्ठ वेतनश्रेणी लागु करुन , एकस्तर योजनेसह , प्रोत्साहन भत्ता , HRA अदा करणेबाबत आदिवासी विकास आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नाशिक यांच्या मार्फत दिनांक 18 फेब्रुवारी 2025 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर परिपत्रकानुसार श्री.भरत पटेल अध्यक्ष स्वाभिमानी शिक्षक / शिक्षकेत्तर संघटना , महाराष्ट्र राज्य नाशिक यांच्या पत्राच्या अनुषंगाने सदर परिपत्रक सादर करण्यात आलेले आहेत . यामध्ये राज्यातील आदिवासी विकास विभाग अंतर्गत कार्यरत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर निर्णय घेण्यात आलेला आहे .

यांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि . भरत पटेल अध्यक्ष स्वाभिमानी शिक्षक , शिक्षकेत्तर संघटना महाराष्ट्र राज्य नाशिक यांनी आदिवासी नक्षलग्रस्त क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कर्मचारी / अधिकाऱ्यांना पदोन्नतीची / वरिष्ठ वेतनश्रेणी लागु करुन , एकस्तर वेतन योजनेसह , प्रोत्साहन भत्ता व घरभाडे भत्ता अदा करणेबाबत …

त्याचबरोबर अनुदानित आश्रमशाळेतील पहारेकरी / सुरक्षारक्षक यांचे कामकाजाच्या वेळेबाबत झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी होणे बाबत आयुक्तालयात निवेदन पत्र सादर करण्यात आले आहेत .

सदर विषयी निवेदनाच्या अनुषंगाने शासन निर्णयानुसार सर्व अपर आयुक्त व सर्व प्रकल्प अधिकारी यांनी नियमोचित कार्यवाही तथा अंमलबजावणी करावी व तसे आयुक्तालयास अवगत करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .  

Leave a Comment