@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा वापर हा मुख्यमंत्री यांच्या अधिनस्त असणारी बाब असून , सदर सहाय्यता निधीमधून मुख्यमंत्री त्यांच्या सहीने काही विशिष्ट उद्दिष्ट्ये समोर ठेवून , नागरिकांना आर्थिक मदत केली जाते .
या मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा मुख्य उद्देश म्हणजे आर्थिक अथवा अन्य स्वरुपातील मदत तात्काळ करणे . यांमध्ये आपल्या राज्यातील अथवा देशातील नैसर्गिक आपत्तींमधील आपत्तीग्रस्तांना सहाय्य करण्यासाठी निधीचा वापर केला जावू शकतो . तसेच जातीय दंगलीमध्ये मृत व्यक्तींच्या वारस दारांना त्याचबरोबर ज्यांना दुखापत झाली आहे व / अथवा ज्यांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे , अशा नागरिकांना मदत केली जाते .
दहशतवादी हल्यांमध्ये मरण पावलेल्या अथवा दुखापत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना सदर मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून मदत केली जाते . रुग्णांना उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्याकरीता अपघाती मरण पावलेल्या ( यांमध्ये मोटार / रेल्वे / विमान / जहाज अपघात वगळता ) व्यक्तींचा वारसांना आर्थिक मदत केली जाते .
तसेच शैक्षणिक , सांस्कृतिक चर्चासत्रे व संमेलने तसेच सामाजिक कार्यक्रमे आयोजनासाठी सदर निधीचा वापर केला जातो . तसेच आर्थिक अथवा अन्य स्वरुपात मदतीची आवश्यकता असणाऱ्या विविध संस्थांना मदत केली जाते .
त्याचबरोबर शैक्षणिक आणि वैद्यकीय आस्थापनांच्या इमारती बांधण्याकरीता अंशत : आर्थीक अथवा अन्य स्वरुपात मदत केली जाते . सदर सहाय्यता निधीमधून लाभ घेण्याकरीता cmrf.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर आवेदन सादर करु शकता ..
-
सरकारी कर्मचाऱ्यांना 40 दिवसांच्या अतिरिक्त वेतन बोनससह , वाढीव भत्ताचा लाभ !
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ government employee extra pay bonus and mahagai Bhatta ] : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना 40 दिवसांचे अतिरिक्त वेतन बोनससह , वाढीव महागाई भत्ताचा लाभ अनुज्ञेय करण्यात आलेला आहे . यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या एकुण सॅलरीमध्ये मोठी वाढ झालेली आहे . सदरचा 40 दिवस बोनस चा लाभ सैन्य दलातील अधिकारी /…