@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा वापर हा मुख्यमंत्री यांच्या अधिनस्त असणारी बाब असून , सदर सहाय्यता निधीमधून मुख्यमंत्री त्यांच्या सहीने काही विशिष्ट उद्दिष्ट्ये समोर ठेवून , नागरिकांना आर्थिक मदत केली जाते .
या मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा मुख्य उद्देश म्हणजे आर्थिक अथवा अन्य स्वरुपातील मदत तात्काळ करणे . यांमध्ये आपल्या राज्यातील अथवा देशातील नैसर्गिक आपत्तींमधील आपत्तीग्रस्तांना सहाय्य करण्यासाठी निधीचा वापर केला जावू शकतो . तसेच जातीय दंगलीमध्ये मृत व्यक्तींच्या वारस दारांना त्याचबरोबर ज्यांना दुखापत झाली आहे व / अथवा ज्यांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे , अशा नागरिकांना मदत केली जाते .
दहशतवादी हल्यांमध्ये मरण पावलेल्या अथवा दुखापत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना सदर मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून मदत केली जाते . रुग्णांना उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्याकरीता अपघाती मरण पावलेल्या ( यांमध्ये मोटार / रेल्वे / विमान / जहाज अपघात वगळता ) व्यक्तींचा वारसांना आर्थिक मदत केली जाते .
तसेच शैक्षणिक , सांस्कृतिक चर्चासत्रे व संमेलने तसेच सामाजिक कार्यक्रमे आयोजनासाठी सदर निधीचा वापर केला जातो . तसेच आर्थिक अथवा अन्य स्वरुपात मदतीची आवश्यकता असणाऱ्या विविध संस्थांना मदत केली जाते .
त्याचबरोबर शैक्षणिक आणि वैद्यकीय आस्थापनांच्या इमारती बांधण्याकरीता अंशत : आर्थीक अथवा अन्य स्वरुपात मदत केली जाते . सदर सहाय्यता निधीमधून लाभ घेण्याकरीता cmrf.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर आवेदन सादर करु शकता ..
-
नविन वेतन आयोगाचे पे – मॅट्रिक्स झाले निश्चित ; जाणून घ्या पगारातील वाढ !

Spread the love@marathiprasar संगिता पवार प्रतिनिधी [ Pay matrix of the new Pay Commission has been finalized. ] : आठवा वेतन आयोगांमध्ये कर्मचारी तसेच पेन्शन धारकांच्या वेतन / पेन्शनमध्ये 20 ते 35 टक्के पर्यंत वाढ होवू शकते . सदर पगार वाढ ही दि.01.01.2026 पासुन सुधारित वेतनसंरचना नुसार लागु करण्यात येणार आहेत . ज्यामध्ये वेतन फरक…
-
राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.19.01.2026 रोजी 05 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR) निर्गमित .

Spread the love@marathiprasar संगिता पवार प्रतिनिधी [ 05 major important Government Decisions (GR) issued on 19.01.2026 regarding state employees. ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.19.01.2026 रोजी 05 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत . 01.तात्पुरती पदोन्नती व पदस्थापना : महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील मुख्याधिकारी गट ब / सहायक आयुक्त , गट ब संवर्गातुन…
-
राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीच्या वयात वाढ नाहीतर , 02 वर्षांनी कमी करणेबाबत GR निर्गमित दि.17.01.2026

Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ GR issued on 17.01.2026 regarding increase or reduction of retirement age of state employees by 02 years ] : सेवानिवृत्तीचे वय 02 वर्षांनी कमी करणेबाबत राज्य शासनाच्या कृषी व पदुम विभागाकडून दि.17.01.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आले आहे…