New Education Policy : यंदा बालवाडी , अंगणवाड्यांमध्ये लागु होणार नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागु होणार आहे , तर सदरचे शैक्षणिक धोरण हे बालवाड्यांपासुन ते उच्च शिक्षणांपर्यंत लागु केले जाणार आहे . चला तर मग नविन शैक्षणिक धोरणांमध्ये कोणते बदल करण्यात आलेले आहेत , ते पुढीलप्रमाणे पाहुयात ..

बालवाड्या / अंगणवाड्यांमध्ये शिकविण्यात येणारे नविन अभ्यासक्रम तयार करण्यात येत आहेत ,यांमध्ये प्रामुख्याने मनोरंजनात्मक / खेळीमेळीतुन अभ्यास व्हावा याकडे अधिक भर दिले जात आहेत . पुर्वप्राथमिक हे एक प्रकाचे शिक्षणाचा पाया असून यापुढे खाजगी क्षेत्रातील अंगणवाड्या / बालवाड्या / नर्सरी मध्ये देखिल मनोरंजनात्मक खेळीतुन अभ्यासक्रम लागु करण्यात येणार आहे .

कारण खाजगी क्षेत्रांमध्ये लहान मुलांना मोठ्या अभ्यासक्रमांच्या ओझ्याखाली शिकवले जाते , त्यामुळे लहान मुलांचा विकास होत नाही . यामुळे नविन राष्ट्रीय धोरणानुसार टप्याने सन 2030 पर्यंत नविन शैक्षणिक धोरण लागु केले जाणार आहेत .

राज्य शासनांच्या अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या अंगणवाड्यांमध्ये डिजिटल साधनांचा अभाव आहे , तसेच अंगणवाडी सेविका / मदतनिस यांना हवा तसे सुविधा दिले जात नाही . यामुळे नविन शैक्षणिक वर्षांपासून अंगणवाडी सेविका / मदतनिस यांना प्रशिक्षण तसेच पगारवाढ / पेन्शन सुविधा उपलब्ध होणार आहेत .

तसेच अंगणवाडी सेविकांना / शिक्षकांना डिजिटल साधनांचा वापर करण्यासाठी प्रशिक्षित केले जाणार असून , प्रशिक्षणांमध्ये कला , क्रिडा , शारीरिक शिक्षण या बाबींकडे अधिक लक्ष दिले जाणार आहेत .

नविन शैक्षणिक धोरणांमध्ये पुर्व- प्राथमिक शिक्षणांकडे अधिक लक्ष देण्यात आलेले आहेत . मुलांची आकलन क्षमता तसेच बौद्धीक क्षमता वाढावी याकरीता उपाय योजना करणेबाबत प्रयोग केले जाणार आहेत .

Leave a Comment