@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठ अंतर्गत पदभरती प्रक्रिया राबविली जात असून , सदर पदांवर निवड झालेल्या कर्मचाऱ्यांस 49,100-155,800/- या वेतनश्रेणीमध्ये वेतन अदा करण्यात येईल . सदर भरती प्रक्रिया संदर्भातील अधिकृत जाहीरात माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .
कोणत्या पदांसाठी पदभरती आहे : यांमध्ये कनिष्ठ अनुवादक ( Junior Traslator ) व दुभाषी ( Interpreter ) पदांच्या एकुण 07 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविली जात आहे .
पात्रता काय असणार आहे ? : सदर पदांसाठी उमेदवार हे कोणत्याही शाखेमधून पदवी उत्तीर्ण ( Graduation ) असणे अनिवार्य असेल , सोबत MSCIT अथवा संगणक हाताळणीचे कोणतेही कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
वयाची अट : आपण जर सदर पदांसाठी आवेदन सादर करु इच्छित असाल तर , आपले वय हे दिनांक 10 मे 2024 रोजी किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 38 वर्षे दरम्यान असावे लागले , जर आपण मागास प्रवर्गांमध्ये मोडत असाल तर आपणांस वयांमध्ये पाच वर्षांची सुट दिली जाईल .
नोकरीचे ठिकाण : मुंबई उच्च न्यायालयाच्या छ.सभाजीनगर ( औरंगाबाद ) खंड पीठ येथे ..
अर्ज कसा कराल ? आपल्याकडे वरील पदांकरीता आवश्यक पात्रता असेल व आपण अर्ज सादर करण्यास इच्छुक असाल तर https://bhc.gov.in/aurtranslator2024/home.php या वेबसाईटवर आपले आवेदन ऑनलाईन पद्धतीने दिनांक 29.05.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिकृत जाहीरात पाहण्याकरीता Click Here (PDF)
-
शिक्षकांसाठी धक्कादायक बातमी ; टीईटी परीक्षा दि.31.08.2026 पर्यंत उत्तीर्ण व्हावीच लागणार – विधी व न्याय विभागाचा अभिप्राय !

Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ TET exam must be passed by 31.08.2026. ] : टीईटी परीक्षा संदर्भात आत्ताची मोठी धक्कादायक बातमी समोर येत आहे . सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात . टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे याबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे . यामुळे यामध्ये राज्य सरकारला हस्तक्षेप करता येणार नाही अशी बाब राज्याचे…
-
सन 2026 या वर्षातील शाळांना सुट्टीची यादी ( दिवाळी , उन्हाळी , इतर सार्वजनिक ) ; पाहा सविस्तर !

Spread the love@marathiprasar चंदना पवार प्रतिनिधी [ List of school holidays for the year 2026 (Diwali, Summer, Other Public); See details.. ] : सन 2026 या वर्षातील शाळांना सुट्टीची यादी अप्पर आयुक्त आ.विकास विभाग नाशिक मार्फत जाहीर करण्यात आलेली आहे . सविस्तर यादी पुढीलप्रमाणे पाहु शकता . उन्हाळी सुट्टी ( दिर्घ सुट्टी ) : दिनांक…
-
हिवाळी अधिवेशनांमुळे दि.13 व 14 डिसेंबर 2025 ची सुट्टी रद्द ; कार्यालये पुर्ण क्षमतेने सुरु ठेवण्याचे परिपत्रक .

Spread the love@marathiprasar चंदना पवार प्रतिनिधी [ Holidays on 13th and 14th December 2025 cancelled due to winter sessions ] : हिवाळी अधिवेशनांमुळे दिनांक 13 व 14 डिसेंबर 2025 रोजीची सुट्टी रद्द करण्यात आली असून , सदर दिवशी पुर्ण क्षमतेने कार्यालये सुरु ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . याबाबत शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत…