@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ new Driving Licence Rules News ] : येत्या 1 जुन पासून राज्यात वाहन परवाना संदर्भात नविन सुधारित नियम लागु होणार आहेत , त्याचबरोबर वाहन चालकांस आता सुधारित नियमांचे पालन करावे लागणार आहेत , अन्यथा दंडाची रक्कम देखिल वाढविण्यात आलेली आहे , चला तर मग सविस्तर नियमावली पुढील प्रमाणे जाणून घेवूयात ..
आपल्याला जर वाहन चालविण्याचा परवाना हवा असल्यास , प्रथम आपणांस आरटीओ कार्यालयाकडे ऑनलाईन आवेदन सादर करावा लागतो , त्यानंतर ऑनलाईन परीक्षा घेण्यात येते , त्यानंतर वाहन चालविण्याची प्रत्यक्ष चाचणी आरटीओ मार्फत घेतली जाते . यास बराच कालावधी निघून जातो , यामुळे आता यापुढे आरटीओ कार्यालयांमध्ये चकरा मारण्याची आवश्यक असणार नाही .
वाहन परवानासाठी आता खाजगी संस्थामार्फत चाचणी घेतली जाईल व चालकास प्रमाणपत्र देखिल दिले जाणार आहेत , यामुळे चालकास वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देखिल मिळेल , व सदर संस्थामार्फत वाहन चालविण्याचा परवाना देखिल प्राप्त होईल .हे एक प्रकारचे प्रमाणपत्र कोर्स असणार आहे . ज्यांमध्ये वाहन चालविण्यासाठी लायसन्स अदा करण्यासाठी परिपुर्ण प्रशिक्षण घ्यावे लागतील . ज्यामुळे अपघात होण्याचे प्रमाण देखिल कमी होतील .
तर यापुढे वाहन चालविण्याबाबत नियमावली अधिक कडक करण्यात आलेली आहे , ती म्हणजे वेग मर्यादा ओलांडून अधिक वेगाने गाडी चालवल्यास ख्, 1 ते 2 हजार रुपये पर्यंतचा दंड भरावा लागणार आहे , तर अल्पवयीन मुलं / मुलींने वाहन चालविल्यास , त्यांस तब्बल 25,000/- रुपये इतका दंड भरावा लागेल .
याशिवाय ज्यांच्या नावे सदर गाडी नोंदणीकृत आहे , अशा व्यक्तींचे वाहन परवाना रद्द होईल , तर सुधारित नियमानुसार आता वयाच्या 25 व्या वर्षापर्यंत व्यक्तींना जड वाहन चालविण्याचा परवाना काढता येणार नाही .
आता यापुढे खाजगी संस्थामार्फत वाहन चालविण्याचा परवाना काढता येणार आहे , म्हणजेच ड्रायव्हिंग प्रशिक्षण स्कूल मार्फतच यापुढे वाहन परवाना काढता येणार आहेत .यामुळे परवाना धारकास वाहन चालविण्याचे योग्य प्रकारचे कौशल्ये मिळणार आहेत . अशा प्रकारची माहिती मिडीया रिपोर्ट नुसार समोर येत आहेत .
-
राज्यातील अनुदानित शाळांना अनुदान वितरीत करण्यास प्रशासकीय मान्यता GR निर्गमित दि.21.03.2025
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Administrative approval for distribution of grants to aided schools in the state GR issued on 21.03.2025 ] : राज्यातील मान्यताप्राप्त असणाऱ्या अनुदानित प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना वेतनेतर अनुदान वितरीत करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत , शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत दिनांक 21 मार्च 2025 रोजी…
-
अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या गट विमा योजनाच्या वर्गणीबाबत , वित्त विभागांकडून महत्वपुर्ण GR निर्गमित दि.21.03.2025
Spread the love@marathiprasar बालाजी पवार प्रतिनिधी [ Important GR issued by Finance Department regarding subscription of Group Insurance Scheme of Officers/Employees ] : वित्त विभागाकडून दिनांक 21 मार्च 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार , अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या गट विमा योजनेच्या वर्गणीबाबत , निर्णय घेण्यात आला आहे . सा.प्र.विभागच्या दिनांक 04 ऑक्टोंबर 2024 रोजीच्या…
-
आता जादा कामासाठी या शासकीय कर्मचाऱ्यांना अतिरिक्त सुधारित मानधन ; GR निर्गमित दि.21.03.2025
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Now additional revised remuneration to these government employees for overtime work; GR issued on 21.03.2025 ] : जादा कामा करीता अतिरिक्त मानधन अदा करणेबाबत सुधारित शासन निर्णय राज्य शासनांच्या नियोजन विभाग मार्फत दिनांक 21 मार्च 2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयानुसार…