मुंबई उच्च न्यायालयाच्या छ.संभाजीनगर खंडपीठ अंतर्गत पदभरती ; 49,100-155,800/- या वेतनश्रेणीमध्ये मिळेल वेतन !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर  खंडपीठ अंतर्गत पदभरती प्रक्रिया राबविली जात असून , सदर पदांवर निवड झालेल्या कर्मचाऱ्यांस 49,100-155,800/- या वेतनश्रेणीमध्ये वेतन अदा करण्यात येईल . सदर भरती प्रक्रिया संदर्भातील अधिकृत जाहीरात माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात . 

कोणत्या पदांसाठी पदभरती आहे : यांमध्ये कनिष्ठ अनुवादक ( Junior Traslator ) व दुभाषी ( Interpreter ) पदांच्या एकुण 07 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविली जात आहे .

पात्रता काय असणार आहे ?  : सदर पदांसाठी उमेदवार हे कोणत्याही शाखेमधून पदवी उत्तीर्ण ( Graduation ) असणे अनिवार्य असेल , सोबत MSCIT अथवा संगणक हाताळणीचे कोणतेही कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

वयाची अट : आपण जर सदर पदांसाठी आवेदन सादर करु इच्छित असाल तर , आपले वय हे दिनांक 10 मे 2024 रोजी किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 38 वर्षे दरम्यान असावे लागले , जर आपण मागास प्रवर्गांमध्ये मोडत असाल तर आपणांस वयांमध्ये पाच वर्षांची सुट दिली जाईल .

नोकरीचे ठिकाण : मुंबई उच्च न्यायालयाच्या छ.सभाजीनगर ( औरंगाबाद ) खंड पीठ येथे ..

अर्ज कसा कराल ? आपल्याकडे वरील पदांकरीता आवश्यक पात्रता असेल व आपण अर्ज सादर करण्यास इच्छुक असाल तर https://bhc.gov.in/aurtranslator2024/home.php या वेबसाईटवर आपले आवेदन ऑनलाईन पद्धतीने दिनांक 29.05.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिकृत जाहीरात पाहण्याकरीता Click Here (PDF)

Leave a Comment