@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : सध्या भारतीय शिक्षण प्रणालीचा विचार केला असता , बी.ए / बी.कॉम / बी.एस्सी करुन नोकरी मिळण्याचे प्रमाण खुपच कमी आहेत . परंतु आजच्या काळांमध्ये व्यावसायिक शिक्षण घेतल्यास , नोकरी मिळण्याचे प्रमाण सर्वाधिक आहेत .
आजच्या काळांमध्ये सुशिक्षित बेरोजगार तरुणांचे प्रमाण सर्वाधिक असून , खाजगी कंपनीला कुशल मनुष्यबळ मिळत नाहीत . आपल्या शैक्षणिक क्षेत्रांमध्ये थेअरीला सर्वाधिक महत्व दिले जाते , परंतु प्रॅक्टिकला नॉलेजला महत्व दिले जात नसल्याने कुशल मनुष्यबळाचा अभाव आहे . तेच जर विदेशातील शिक्षणांचा विचार केला असता , विदेशांमध्ये प्रॅक्टिकल नॉलेजला सर्वाधिक महत्व दिले जाते .
जसे कि , आपण जर आजकाल खाजगी कंपन्यांमध्ये आयटीआय झालेल्या ( प्रॅक्टीकल नॉलेज ) विद्यार्थ्यांस बी.ई झालेल्या विद्यार्थ्यांच्या तुलनेमध्ये चांगला पगार दिला जात आहे , कारण बी.ई झालेल्या बहुतांश विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल नॉलेज नसते . यामुळे आपल्या देशांमध्ये डिग्री होल्डरांची संख्या वाढत चालली असली तर , प्रॅक्टिकल नॉलेज मोठा अभाव आहे .
हेच जर आपल्या शेजारील देश चीन देशांचा विचार केला तर चीन देशांमध्ये प्रॅक्टिकल नॉलेजला सर्वाधिक महत्व देतात , त्यामुळे चीन हा लोकसंख्याच्या दृष्टीने नंबर 1 ला असता तर , सर्वांना रोजगार उपलब्ध करुन देण्याची क्षमता आहे . तसे आपल्या देशातील अनेक लोकं विदेशांमध्ये कामगार म्हणून कामास जातात .
भविष्यांमध्ये या फिल्डला येणार सर्वाधिक महत्व : भविष्यांमध्ये आयटी सेक्टरला सर्वाधिक महत्व येईल , यामुळे येत्या 10 वर्षांमध्ये या क्षेत्रांमध्ये सर्वाधित जॉब उपलब्ध होणार आहेत . आजच जर पाहिले तर सर्वच क्षेत्रांमध्ये आयटी सेक्टरचा वापर केला जात आहे .
ऑनलाईन शॉपिंग , ऑनलाईन व्यापार , ऑनलाईन मिटींग , ऑनलाईन कामकाज , अनेक कामांचा मोबाईलचा वापर तसेच आधुनिक तंत्रज्ञानांचा वापर करुन अनेक काम सुरळीत केले जात आहेत . यामुळे येत्या 10 वर्षांमध्ये याचे प्रमाण सर्वाधिक वाढणार आहेत . यामुळे या क्षेत्राला कंट्रोल करण्यासाठी कुशल आयटी क्षेत्रातील कामगारांची आवश्यक भासेलच , यामुळे आपण जर आयटी क्षेत्रातील शिक्षण घेतल्यास , भविष्यांमध्ये आपल्या हाताला काम मिळेलच याची गॅरंटी मिळेल . त्याचबरोबर विदेशांमध्ये देखिल चांगल्या पॅकेजची नोकरी मिळेल .
-
राज्य कर्मचाऱ्यांना 3 वर्षातुन 10 दिवस मिळते या कामासाठी पगारी रजा ; जाणून घ्या वित्त विभागाचा शासन निर्णय !
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ State employees get 10 days paid leave for this work every 3 years; Know the government decision of the Finance Department ] : राज्य कर्मचाऱ्यांना वर्षातुन 10 दिवस खाली नमुद करण्यात आलेल्या प्रयोजनासाठी पगारी रजा अनुज्ञेय करण्यात येते . याबाबत वित्त विभागा मार्फत निर्गमित सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे…
-
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकरीता महत्वपुर्ण राजपत्र निर्गमित दि.18.07.2025
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Important Gazette issued for Zilla Parishad employees on 18.07.2025 ] : जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांकरीता ग्राम विकास विभाग मार्फत दिनांक 18 जुलै 2025 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन राजपत्र निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन परिपत्रकानुसार , नमुद करण्यात आलेले आहेत कि , महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा…
-
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा रजेबाबत खास महत्वपुर्ण निर्णय ; संसदेत दिली माहिती !
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Modi government’s important decision regarding leave for government employees; Information given in Parliament. ] : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा रजेबाबत खास महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे . या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना सलग 30 दिवसांची भरपगारी रजा मिळणार आहे . सरकारी कर्मचाऱ्यांच्या रजे संदर्भात संसदेत प्रश्न विचाराण्यात आलेला होता…