@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Big drop in gold prices ] : सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी घसरण झाली आहे , यामुळे सोने – खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ही सुवर्णसंधी असणार आहे . तज्ञांच्या मते सोन्याची किमती प्रति तोळा 56,000/- रुपये पर्यंत दर घसरण्याची शक्यता वर्तवली आहे .
यामागची कारणे देखील तज्ञांकडून देण्यात आले आहे , यामुळे सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याची ही उत्तम संधी गुंतवणूकदारांना असणार आहे . सोन्याची 3 एप्रिल रोजी दहा ग्रॅम सोन्याची किंमत 93 हजार रुपये इतकी होती . तर काल दिनांक 04 एप्रिल रोजी सोन्याच्या किमतीमध्ये एकाच दिवसात 1600/- रुपयांची घसरण झाली आहे , तर भविष्यात देखील सोन्याच्या किमतीत घसरण होण्याची शक्यता तज्ञांकडून व्यक्त केली आहे .
सोन्याच्या किमतीत घसरण होण्याची प्रमुख कारणे : जागतिक स्तरावर सोन्याचे उत्पादनामध्ये मोठी वाढ झाली आहे . यामुळे सोन्याचा साठा हा 9% ने वाढला आहे , याशिवाय ऑस्ट्रेलियामध्ये मोठ्या प्रमाणात सोन्याचे खाणकाम सुरू आहे व जुने सोने बाजारामध्ये परत येत असल्याने , पुरवठा मोठ्या प्रमाणात वाढत आहे .
सोन्याच्या मागणीमध्ये मोठ्या प्रमाणात घट दिसून येत आहे , यामुळेच सोन्याची खरेदी कमी प्रमाणात होत आहे . यामुळेच सोन्याची किंमत देखील घसरत असल्याचा दावा तज्ञाकडून करण्यात आला आहे .तर मागील दोन दिवसांमध्ये चांदीच्या दरामध्ये देखील मोठी घसरण दिसून आली .
त्याचबरोबर सोन्याच्या किमतीमध्ये घसरण होण्याचे प्रमुख कारणांमध्ये अमेरिकेने भारतासह, 180 देशावर शुल्क लादले आहे . यामुळे जागतिक मंदीचा परिणाम म्हणून सोने- चांदीच्या किमतीत घट होताना दिसून येत आहे .
- राज्यातील पेन्शनधारकांसाठी सा. प्र. विभागाचा अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय ( GR) ; जाणून घ्या सविस्तर !
- 01 रुपयांत पिक विमा योजना बंद ; आता खरीप हंगामात पिकनिहाय प्रति हेक्टर इतकी विमा रक्कम भरावी लागणार !
- सरकारी / निमसरकारी / महामंडळे मधील कार्यरत कर्मचाऱ्यांच्या मुलास नॉन क्रिमिलेअर अंतर्गत आरक्षणाचा लाभ घेवू शकतो का ?
- दिनांक 25 ते 28 जुन दरम्यान पाऊसमान अंदाज : जाणून घ्या सविस्तर !
- सरळसेवा पदभरती प्रक्रिया मध्ये किमान पर्सेंटाईल अर्हतामान लागु ; महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा मोठा निर्णय ! जाणून घ्या सविस्तर परिपत्रक !