@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Maharashtra state all post recruit in mpsc gr ] : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील सर्व सरकारी कार्यालयातील गट ब ( अराजपत्रित ) व गट क ( वाहन चालक ) वगळून पदे हे सरळसेवेने MPSC मार्फत भरणेबाबत , सामान्य प्रशासन विभाग मार्फत दिनांक 18 जुलै 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील गट अ , गट ब ( राजपत्रित ) त्याचबरोबर MPSC आयोगाच्या कक्षेतील गट ब ( अराजपित्रत ) व गट क संवर्गातील पदे MPSC आयोग मार्फत भरण्यात येतात .
सदरच्या निर्णयानुसार राज्यातील MPSC आयोगाच्या कक्षे बाहेरील गट ब ( अराजपत्रित व गट क ( वाहन चालक ) संवर्गातील सर्व पदे सरळसेवेने टप्याटप्याने MPSC आयोग मार्फत भरण्यास मान्यता देण्यात येत आले आहेत . सदर पदे MPSC मार्फत पदे भरणे करीता समन्वय राखण्यासाठी अपर मुख्य सचिव ( सेवा ) यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे गठण करण्यात आलेले आहेत .
तसेच गट क संवर्गातील वाहन चालक व गड या संवर्गातील पदे दिनांक 04.05.2022 रोजीच्या निर्णय अथवा त्या संदर्भात शासनांच्या धोरणाप्रमाणे वेळोवेळी निर्गमित करण्याात आलेल्या आदेशानुसार निवड समितीमार्फत भरण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
इतर कंपन्यांमार्फत होणारे परीक्षेतील गैरप्रकार त्याचबरोबर अधिक शुल्कामुळे राज्य शासन सेवेतील सर्व कार्यालयांतील परीक्षा ह्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे .
MPSC कक्षेत आणलेल्या गट ब ( अराजपत्रित ) व गट क ( वाहन चालक ) वगळुन पदांसाठीचे यापुर्वी लागु असलेले आरक्षण धोरण व अनुषंगिक सोयी – सवलती यापुढेही लागु राहणार असल्याचे नमुद करण्यात आलेले आहेत .
या संदर्भात सा.प्र.विभाग मार्फत निर्गमित GR पुढील प्रमाणे पाहु शकता ..
-
ताज्या बातम्या : आत्ताची काही प्रमुख चालु घडामोडी !

Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ latest news ] : आत्ताच्या काही प्रमुख चालु घडामोडी या लेखांमध्ये पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .. तपोवन वाद : नाशिक कुंभमेळासाठी तपोवन येथे हजारो झाडे तोडली जात आहे , त्या विरोधात आता सयाजी शिंदे , राज ठाकरे , समाजसेवक रिंगणात उतरले आहेत . याशिवाय आता नागरिकांकडून देखिल सोशल मिडीयावर…
-
देशावर पेन्शन संकट वाढणार ; मिडीया रिपोर्ट !

Spread the love@marathiprasar संगिता पवार प्रतिनिधी [ Pension crisis will increase in the country; Media report ] : देशावर पेन्शनचे संकट वाढणार असल्साचा दावा मिडीया रिपोर्टने केला आहे . याबाबतचे ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात . भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो , तर पुढील 30 वर्षाच्या नंतर वृद्धांची संख्या वाढणार आहे . यामुळे…
-
दि.02 , 05 , 06 व 07 डिसेंबर रोजी राज्यातील शाळा /महाविद्यालये , सरकारी कार्यालयांना सुट्टी !

Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Holidays for schools and colleges in the state on December 2nd, 5th and 6th ] : दिनांक 02 डिसेंबर , 05, 06 व 07 डिसेंबर रोजी राज्यातील शाळा / महाविद्यालये तसेच सरकारी कार्यालयांना सुट्टी असणार आहे . दिनांक 02 डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी : दिनांक 02 डिसेंबर रोजी…