@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Maharashtra state all post recruit in mpsc gr ] : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील सर्व सरकारी कार्यालयातील गट ब ( अराजपत्रित ) व गट क ( वाहन चालक ) वगळून पदे हे सरळसेवेने MPSC मार्फत भरणेबाबत , सामान्य प्रशासन विभाग मार्फत दिनांक 18 जुलै 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील गट अ , गट ब ( राजपत्रित ) त्याचबरोबर MPSC आयोगाच्या कक्षेतील गट ब ( अराजपित्रत ) व गट क संवर्गातील पदे MPSC आयोग मार्फत भरण्यात येतात .
सदरच्या निर्णयानुसार राज्यातील MPSC आयोगाच्या कक्षे बाहेरील गट ब ( अराजपत्रित व गट क ( वाहन चालक ) संवर्गातील सर्व पदे सरळसेवेने टप्याटप्याने MPSC आयोग मार्फत भरण्यास मान्यता देण्यात येत आले आहेत . सदर पदे MPSC मार्फत पदे भरणे करीता समन्वय राखण्यासाठी अपर मुख्य सचिव ( सेवा ) यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे गठण करण्यात आलेले आहेत .
तसेच गट क संवर्गातील वाहन चालक व गड या संवर्गातील पदे दिनांक 04.05.2022 रोजीच्या निर्णय अथवा त्या संदर्भात शासनांच्या धोरणाप्रमाणे वेळोवेळी निर्गमित करण्याात आलेल्या आदेशानुसार निवड समितीमार्फत भरण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
इतर कंपन्यांमार्फत होणारे परीक्षेतील गैरप्रकार त्याचबरोबर अधिक शुल्कामुळे राज्य शासन सेवेतील सर्व कार्यालयांतील परीक्षा ह्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे .
MPSC कक्षेत आणलेल्या गट ब ( अराजपत्रित ) व गट क ( वाहन चालक ) वगळुन पदांसाठीचे यापुर्वी लागु असलेले आरक्षण धोरण व अनुषंगिक सोयी – सवलती यापुढेही लागु राहणार असल्याचे नमुद करण्यात आलेले आहेत .
या संदर्भात सा.प्र.विभाग मार्फत निर्गमित GR पुढील प्रमाणे पाहु शकता ..
-
कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय खर्चाची प्रतिपुर्ती मंजूर करणेबाबत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.04.12.2025

Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Important GR issued on approval of reimbursement of medical expenses of employees dated 04.12.2025 ] : वैद्यकीय प्रतिपुर्ती मंजुर करण्याचे प्रशासकीय विभागास असणारे अधिकारी हे प्रत्त्यायाजित करणेबाबत महसुल व वन विभाग मार्फत दि.04.12.2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले…
-
कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वपुर्ण “राईट टु डिस्कनेक्ट – 2025” विधेयक लोकसभेत सादर ; कर्मचाऱ्यांना मिळणार मोठा दिलासा !

Spread the love@marathiprasar चंदना पवार प्रतिनिधी [ Very important Right to Disconnect Bill 2025 for employees introduced in Lok Sabha ] : कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वपुर्ण राईट टु डिस्कनेक्ट -2025 विधेयक लोकसभेत सादर करण्यात आले आहे . सदर विधेयकानुसार देशातील खाजगी तसचे सरकारी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे . त्यांना आपले वैयक्तिक आयुष्य जगण्यासाठी कामातुन…
-
दीर्घकालीन सुट्या उपभोगणाऱ्यांना अर्जित रजेचा लाभ ; मा.आ.सुधाकर अडबाले यांच्या प्रयत्नांस यश !

Spread the loveसंगिता पवार प्रतिनिधी [ Earned leave benefits for those enjoying long-term leave ] : दीर्घकालीन सुट्या उपभोगणाऱ्या राज्यातील अधिकारी / कर्मचाऱ्यांना अर्जित रजेचा लाभ मिळत नाही . परंतु मा.आ.सुधाकर अडबाले यांच्या प्रयत्नांमुळे कर्मचाऱ्यांना दिलासा प्राप्त झालेला आहे . अर्जित रजेचे रोखीकरण हे फक्त दीर्घकालीन सुट्टीचा लाभ न घेणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना मिळत होता…