@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ State employees will get revised pay scale and differential amount from 2016 as per the Seventh Pay Commission.] : राज्य कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार सुधारित वेतनश्रेणी लवकरच मिळणार आहे , या संदर्भात राज्य सरकारकडून गठित करण्यात आलेल्या समितीने वेतन त्रुटीचे निवारण करून सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याचा अहवाल राज्य सरकारकडे सादर करण्यात आलेला आहे .
वेतन त्रुटी / वेतनातील असमानता : सातवा वेतन आयोगामध्ये बऱ्याच पदांच्या वेतनश्रेणीमध्ये तफावत तसेच वेतनत्रुटी आढळून आलेल्या आहेत . सदर वेतन त्रुटींचे निवारण करण्याकरिता माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार , वेतन त्रुटी निवारण समिती राज्य सरकारकडून गठित करण्यात आलेली होती.
सदर गठीत करण्यात आलेल्या समितीने आपला अहवाल राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आलेला आहे . सदर राज्य सरकारच्या मंजुरीनंतर वेतन त्रुटी असणाऱ्या पदांना सातवा वेतन आयोगामध्ये (7th Pay commission ) सुधारित वेतन लागू करण्यात येईल .
हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना हे 02 आर्थिक लाभ एकदाच ; पगारात मोठी वाढ !
काही विभागामध्ये समान काम , समान पदे असून देखील वेतन त्रुटी मध्ये तफावत आहे . सदर वेतन त्रुटी तफावत दूर करण्याकरिता गठित अभ्यास समितीने त्रुटींचे निवारण करून प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केला आहे . अशा वेतन त्रुटी असणाऱ्या पदांना सुधारित वेतनश्रेणी लवकरच लागू करण्यात येणार आहे .
वेतनत्रुटी निवारण समिती अहवालास कधी मंजुरी : सातवा वेतन आयोगानुसार (8th pay commission ) वेतनामध्ये असणाऱ्या त्रुटींचे निवारण करण्याकरिता गठीत करण्यात आलेल्या अभ्यास समितीच्या प्रस्तावाला पुढील तीन महिन्यात मंजुरी मिळण्याची शक्यता आहे .
फरकाची रक्कम मिळणार : सदरची वेतनत्रुटी ही सातवा वेतन (7th Pay commission ) आयोगातील असल्याने , सदर सुधारित वेतनश्रेणी लागू झाल्यानंतर दिनांक 01 जानेवारी 2016 पासून सुधारित वेतनश्रेणी लागू केली जाईल व तेव्हापासून वेतनाचा फरक अदा केला जाईल .
आपण जर कर्मचारी निवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !
- NPS : राष्ट्रीय पेन्शन योजनाची नविन नियमावली जारी ; जाणुन घ्या सुधारित नियम !
- राज्य कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा ; उच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांच्या मागणीला दिली मंजूरी !
- केंद्राप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांनाही दि.01.07.2025 पासुन 3% महागाई भत्ता वाढ मिळणेबाबत ….
- शिक्षकांसाठी धक्कादायक बातमी ; टीईटी परीक्षा दि.31.08.2026 पर्यंत उत्तीर्ण व्हावीच लागणार – विधी व न्याय विभागाचा अभिप्राय !
- सन 2026 या वर्षातील शाळांना सुट्टीची यादी ( दिवाळी , उन्हाळी , इतर सार्वजनिक ) ; पाहा सविस्तर !
