गुणवंत अधिकारी / कर्मचारी म्हणून गौरव करण्याची योजना अंतर्गत पुरस्कार ; शासन निर्णय दि.09.05.2025

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Awards under the scheme to honour meritorious officers/employees ] : ग्राम विकास  ( मंत्रालय खुद्द ) त्याचबरोबर क्षेत्रिय स्तरावरील गुणवंत अधिकारी / कर्मचारी म्हणून गौरव करण्याची योजना सन 2023-24 करीता अंतिम निवड करण्यात आलेली आहे , या संदर्भात ग्राम विकास विभाग मार्फत दिनांक 09 मे 2025 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे .

शासकीय योजना तसेच प्रकल्प राबवित असताना काही अधिकारी / कर्मचारी आपले वैयक्तिक कौशल्य व गुणवत्ताचा वापर करतात अशा गुणवंतअधिकारी / कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्‍ह देवून गौरव करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .

सदर शासन निर्णयानुसार सन 2023-24 या वर्षी ग्राम विकास विभागातील व क्षेत्रिय स्तरावरील गुणवंत अधिकारी / कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देवून गौरव करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .

हे पण वाचा : सुधारित वेतनश्रेणीचा लाभ 2016 पासुन फरकासह मिळणार ..

सन 2023-24 या वर्षाकरीता एकुण 34 अधिकारी / कर्मचारी यांना पुरस्कारासाठी अंतिम निवड करण्यात आलेली आहे . अशा निवड झालेल्या गुणवंत अधिकारी / कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवा पुस्तकांमध्ये संबंधित विभाग / कार्यालय प्रमुख यांनी प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला अशी नोंद करण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात आले आहेत . निवड झालेल्या 34 गुणवंत अधिकारी / कर्मचारी यांची यादी तसेच सदर सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click here

आपण जर कर्मचारी निवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Comment