@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Some important matters in Maharashtra’s economic crisis; Provision of special funds for this work.. ] : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असुन , काल दिनांक 10.03.2025 रोजी राज्याचे वित्त मंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पामध्ये काही विशिष बाबीसाठी निधीची तरतुद करण्यात आलेली आहे .
स्टीब हब : जिल्हा गडचिरोली येथे स्टील हब तयार करण्यासाठी या जिल्हामध्ये खनिकर्म महामार्गांचे जाळे विकसित करणे कामी रुपये 500/- कोटी इतका निधी खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे .
07 ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यापार केंद्र : राज्यात वांद्रे -कुर्ला , वडाळा , गोरेगाव , कुर्ला – वरळी , नवी मुंबई , खारखर , विरार बोईसर अशा 07 ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यापार केंद्र निर्माण करण्यात येणार आहेत .
- सामुहिक प्रोत्साहन योजना अंतर्गत रुपये 6,400/- कोटी इतका निधी अनुदान मंजूर करण्यास मान्यता .
- लाडकी बहीण योजनांच्या प्रभावी अंमलबजावणी करीता महिला व बाल विकास योजनासाठी तब्बल 31,907 कोटी रुपये इतका निधी वितरीत करण्यास मंजूरी देण्यात आली .
- उर्जा विभागास 21,534 कोटी रुपयाची तरतुद .
उर्वरित प्रमुख विभाग व विभाग निहाय अर्थसंकल्पीत निधी तक्ता पुढीलप्रमाणे पाहु शकता .
विभागाचे नाव | अर्थसंकल्पीत निधी |
सार्वजनिक बांधकाम ( रस्ते ) – सार्वजनिक उपक्रम वगळून | 19,079 कोटी रुपये |
जलसंपदा | 15,932/- कोटी रुपये |
ग्रामविकास | 11,480/- कोटी रुपये |
नगर विकास | 10,629/- कोटी रुपये |
कृषी | 9,710/- कोटी रुपये |
नियोजन | 9,060.45 कोटी रुपये |
इतर मागास बहुजन कल्याण | 4,368/- कोटी रुपये |
मृदा व जलसंधारण विभाग | 4,247/- कोटी रुपये |
- राज्यातील पेन्शनधारकांसाठी सा. प्र. विभागाचा अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय ( GR) ; जाणून घ्या सविस्तर !
- 01 रुपयांत पिक विमा योजना बंद ; आता खरीप हंगामात पिकनिहाय प्रति हेक्टर इतकी विमा रक्कम भरावी लागणार !
- सरकारी / निमसरकारी / महामंडळे मधील कार्यरत कर्मचाऱ्यांच्या मुलास नॉन क्रिमिलेअर अंतर्गत आरक्षणाचा लाभ घेवू शकतो का ?
- दिनांक 25 ते 28 जुन दरम्यान पाऊसमान अंदाज : जाणून घ्या सविस्तर !
- सरळसेवा पदभरती प्रक्रिया मध्ये किमान पर्सेंटाईल अर्हतामान लागु ; महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा मोठा निर्णय ! जाणून घ्या सविस्तर परिपत्रक !