@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Big update from Rajya Sabha regarding the Eighth Pay Commission ] : आठवा वेतन आयोग बाबत राज्यसभेतुन मोठी महत्वपुर्ण अपडेट समोर येत आहे , राज्यसभेत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर केंद्रीय वित्त मंत्रालयाकडून दिलासादायक माहिती देण्यात आलेली आहे .
राज्यसभेच्या अतारांकित प्रश्न क्र.237 च्या अनुषंगाने सदस्य जावेद अली खान व श्री रामजी लाल सुमन यांच्याकडून वित्त मंत्रालयास प्रश्न उपस्थित करण्यात आला होता . सदर प्रश्न हा केंद्रीय अर्थमंत्र्यांना विचारण्यात आलेला होता . यावर केंद्रीय अर्थराज्यमंत्री यांनी दिलासादायक प्रतिउत्तर दिले आहेत .
अतारांकित प्रश्न क्र.237 : दिनांक 04.02.2025 रोजी सदर प्रश्न आठव्या केंद्रीय वेतन आयोगाची रचना संदर्भात उपस्थित करण्यात आलेला होता . यांमध्ये असे विचारण्यात आले आहेत कि , केंद्रीय केंद्रीय मंत्रीमंडळाने माहे जानेवारी महीन्यात केंद्र सरकारी कर्मचारी व पेन्शनधारकांसाठी आठव्या वेतन आयोग ( CPC ) च्या स्थापनेला मान्यता दिली आहे का . तसे असल्यास त्याचे तपशिल काय ?
वरील प्रश्नाला केंद्रीय राज्य वित्त मंत्री श्री.पंकज चौधरी यांनी प्रतिउत्तर देत सांगितले कि , आठवा केंद्रीय वेतन आयोगाच्या स्थापनेला केंद्र सरकारकडून मंजूरी देण्यात आलेली आहे . तर त्या संदर्भातील सविस्तर तपशिल लवकरच जाहीर करण्यात येईल , असे नमुद करण्यात आले आहेत .
तसेच यांमधील प्रश्न C ) मध्ये विचारण्यात आले आहे कि , आठव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष व सदस्य केंव्हा नियुक्त केले जातील व त्याच्या घटनेची अधिसूचना केंव्हा जारी करण्यात येईल ? व आठवा वेतन आयोग सादर करण्याचे वेळापत्रक काय ?
वरील प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय वित्त राज्यमंत्री श्री.पंकज चौधरी यांनी नमुद केले आहे कि , या संदर्भात योग्यवेळी निर्णय घेण्यात येतील .

- NPS : राष्ट्रीय पेन्शन योजनाची नविन नियमावली जारी ; जाणुन घ्या सुधारित नियम !
- राज्य कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा ; उच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांच्या मागणीला दिली मंजूरी !
- केंद्राप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांनाही दि.01.07.2025 पासुन 3% महागाई भत्ता वाढ मिळणेबाबत ….
- शिक्षकांसाठी धक्कादायक बातमी ; टीईटी परीक्षा दि.31.08.2026 पर्यंत उत्तीर्ण व्हावीच लागणार – विधी व न्याय विभागाचा अभिप्राय !
- सन 2026 या वर्षातील शाळांना सुट्टीची यादी ( दिवाळी , उन्हाळी , इतर सार्वजनिक ) ; पाहा सविस्तर !