@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Proposals for the Eighth Pay Commission, important recommendations on pay bands, fitment factors ] : केंद्र सरकारने जाहीर केल्यानुसार आठवा वेतन आयोगाला मंजूरी देण्यात आलेली आहे , तर या अनुषंगाने विविध प्रस्ताव व नविन वेतनबँक तसेच फिटमेंट फॅक्टर संदर्भातील नविन शिफारशी जाहीर केल्या जात आहेत . या संदर्भातील सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात ..
फिटमेंट फॅक्टर : सातवा वेतन आयोग हे 2.57 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे निश्चित करण्यात आलेला होता , तर आता आठवा वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर हा 2 पट पेक्षा कमी नसावा , अशी शिफारस करण्यात आलेली आहे . यामुळे कर्मचाऱ्यांना किमान वेतनाची हमी मिळणार आहे .
पेन्शनवृद्धी : पेन्शन धारकांना देखिल सुधारित वेतन आयोगानुसार , पेन्शन वृद्धी केली जाणार आहे , ज्यांमध्ये किमान 2 पट फिटमेंट फॅक्टर वाढीनंतर पेन्शन मध्ये 25 ते 30 टक्क्यांची वाढ होणार आहे .
सुधारित वेतनबँड : आठवा वेतन आयोगांमध्ये सर्वच विभागातील समान काम करणाऱ्या पदांना समान वेतनबँड सुधारणा करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे . ज्यामुळे सर्वच विभागांमध्ये समानता दिसून येणार आहे .
इतर देय भत्ते स्वयंचलित पद्धतीने वाढीची मागणी : कर्मचाऱ्यांना देय असणारे भत्ते हे स्वयंचलित पद्धतीने वाढतील अशी तरतुद करण्याची मागणी करण्यात आलेली आहे . ज्यामुळे कर्मचाऱ्यांना वेतन / भत्ते वाढीसाठी शासन अधिसुचना / निर्णयाची वाट पहावी लागणार नाही .
- राज्य कर्मचारी / अधिकारी संदर्भात दि.13 जुन रोजी निर्गमित करण्यात आले 02 महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )
- महाराष्ट्र पेन्शनर्स : पेन्शन धारकांसाठी आत्ताची मोठी अपडेट ; पेन्शनर्स असोसिएशन , पुणे मार्फत प्रसिद्धपत्रक निर्गमित !
- दि.10 जुन 2025 रोजी झालेल्या राज्य मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण कॅबिनेट निर्णय !
- निवृत्त कर्मचाऱ्यांच्या सेवा करार पद्धतीने घेणे व जुनी पेन्शन बाबत 02 स्वतंत्र शासन निर्णय निर्गमित दि.10.06.2025
- राज्य कर्मचारी संदर्भात दिनांक 10 जुन रोजी घेण्यात आले 03 महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR ) !