पेन्शनधारकांच्या नियमित निवृत्तीवेतन संदर्भात अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित दि.17.01.2025

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ penshiener imp shasn nirnay ] : जिल्हा परिषद निवृत्ती वेतन धारकांची यांमध्ये शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी वगळून नियमित निवृत्तीवेतन , निवृत्ती वेतन प्रकरणे , तसेच नविन निवृत्ती वेतन प्रणालीमधून तयार करणे संदर्भात महत्वपुर्ण GR ग्राम विकास विभाग मार्फत दिनांक 17 जानेवारी 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे .

या शासन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आले आहे कि , जिल्हा परिषदांमधून सेवानिवृत्त झालेल्या निवृत्ती वेतन धारकांचे निवृत्तीवेतन विनाविलंब व देय दिनांकास होण्याकरीता आत्तापर्यंत मनुष्यबळाद्वारे तयार करण्यात येणारी निवृत्ती वेतन देयके यापुढे मे.महाआयटी लिमिटेड यांच्याकडून विकसित नविन निवृत्ती प्रणालीमधून निर्माण करुनच तयार करण्यात येईल असे नमुद करण्यात आलेले आहेत .

याकरीता नविन निवृत्तीवेतन प्रणालीमध्ये निवृत्तीवेतन धारकांची संपुर्ण माहिती सदर प्रणालीमध्ये भरणे व त्या आधारे प्रणालीमधून निवृत्ती वेतन देयके तयार करणे हि उद्दिष्ट्ये विचारात घेवून , मे. महाआयटी लि. यांच्याकडून निवृत्तीवेतन प्रणाली तयार करण्यात आलेली आहे .

याकरीता जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील निवृत्तीवेतन धारकांची बिनचूक माहिती या नविन निवृत्तीवेतन प्रणालीवर अंतभुत करणे व भरलेली माहिती बरोबर आहे याची खात्री करण्याची जबाबदारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद यांची राहणार आहे .

तसेच सदर निर्णयांमध्ये सदर निवृत्तीवेतन बँकेमार्फत प्रदान करण्यसाठी व मासिक निवृत्तीवेतन विषयक खर्चाच्या बाबी जिल्हा लेख्यामध्ये समाविष्ट करण्याची कार्यवाही नमुद करण्यात आलेली आहे .

या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय ( GR ) डाऊनलोड करण्यासाठी Click Here

Leave a Comment