@Marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ state employee retirement age update ] : राज्य शासन सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयात वाढ होणार का नाही ? या बाबत कर्मचाऱ्यांच्या मध्ये अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत . या संदर्भात मंत्रालयीन स्तरावर कोणत्या हालचाली सुरु आहेत , याबाबतची सविस्तर अपडेट खालील प्रमाणे जाणून घेवूयात ..
निवृत्तीच्या वयात वाढ करण्याची आवश्यकता : सध्याच्या स्पर्धेच्या युगांमध्ये उमेदवार हे वयाच्या बाबतीत उशिरा नोकरीला लागतात , यामुळे त्यांना कमी सेवा मिळते . तर सध्याच्या पेन्शन योजना देखिल सेवेच्या कालावधीनुसार लागु करण्यात आलेली असल्याने , निवृत्तीचे वय अधिक असेल तर कर्मचाऱ्यांना अधिक पेन्शनचा लाभ मिळेल .
यामुळेच निवृत्तीच्या वयात वाढ करण्याची कर्मचाऱ्यांच्या वतीने गरजेचे आहे . सध्यस्थितीमध्ये कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे ( ड संवर्ग वगळून ) 58 वर्षे इतके आहे . तर कर्मचाऱ्यांच्याकडून निवृत्तीचे वय ड संवर्गातील कर्मचाऱ्यांप्रमाणे वाढवून 60 वर्षे करण्याची बऱ्याच दिवसांपासूनची मागणी आहे .
कारण देशांमध्ये केंद्र सरकारी कर्मचारी तसेच देशातील इतर 25 राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे 60 वर्षे आहेत , त्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे 60 वर्षे करण्याची मागणी केली जात आहेत .
मंत्रालयीन स्तरावरील याबाबतच्या हालचाली : मंत्रालय स्तरावर याबाबतचा प्रस्ताव निवडणुकीमुळे प्रलंबित ठेवण्यात आला आहे , या शिवाय सदर प्रस्तावाला स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या उमेदवारांकडून विरोध दर्शविण्यात आलेला असून काही लोकप्रतिनिधींकडून देखिल या प्रस्तावास विरोध दर्शविण्यात आलेला आहे . यामुळेच सदर प्रस्ताव अद्याप पर्यंत प्रलंबित आहे .
- 01 जुलै पासुन 04 जुलै पर्यंत राज्यात पावसाची दमदार सुरुवात ; IMD कडून या जिल्ह्यांना तुफान पावसाची शक्यता !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !
- नविन वेतन आयोग किमान फिटमेंट फॅक्टर राज्य कर्मचाऱ्यांचे किमान वेतन Pay Scale नुसार जाणून घ्या , संभाव्य वेतनश्रेणी !
- राज्यातील पेन्शनधारकांसाठी सा. प्र. विभागाचा अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय ( GR) ; जाणून घ्या सविस्तर !