@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ mahagai Bhatta vadh nirnay update news ] : केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2025 पासुन परत डी.ए वाढ मिळणार आहे , तर राज्य कर्मचाऱ्यांना अद्याप जुलै 2024 ची डी.ए वाढ मिळालेली नाही . याबाबतची सद्यस्थिती काय आहे , ते खालीलप्रमाणे पाहुयात ..
केंद्रीय कर्मचाऱ्यांना परत 3 टक्के डी.ए वाढीचा लाभ : सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातुन दोनदा लाभ दिला जातो , यांमध्ये जुलै व जानेवारीत महागाई भत्ता वाढ लागु करण्यात येत असते , यानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना जोनवारी 2025 पासुन परत एकदा 3 टक्क्यांची डी.ए वाढ लागु करण्यात येणार आहे . सदरची आकडेवारी ( डी. ए गणना ) ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या ( AICPI ) आधारावर निश्चित करण्यात येते .
केंद्र सरकारने डी.ए मध्ये परत 03 टक्क्यांची वाढ लागु केल्यास , केंद्रीय कर्मचारी / पेन्शन धारकांना जानेवारी 2025 पासुन एकुण 56 टक्के दराने डी.ए वाढ लागु होईल . ज्याचा लाभ नंतर राज्य सरकारी कर्मचारी / पेन्शनधारकांना होईल .
महाराष्ट्र राज्य कर्मचारी / पेन्शन धारकांना डी.ए वाढीचा लाभ कधी ? : महाराष्ट्र राज्य कर्मचारी / पेन्शन धारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर माहे जुलै 2024 पासुनचा वाढीव 3 टक्के महागाई भत्ताचा लाभ अद्याप रोखून ठेवला आहे , सदर डी.ए वाढीचा निर्णय राज्य सरकारकडून लवकरच घेण्यात येणार असल्याचे वृत्त मिडीया रिपोर्टनुसार , समोर येत आहेत .
प्राप्त माहितीनुसार , सदर राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव 03 टक्के डी.ए वाढीचा प्रस्ताव मुख्यमंत्र्याकडे सादर करण्यात आला असून , याबाबत राज्याचे मा.मुख्यमंत्री पुढील आठवड्यात याबाबत अधिकृत्त घोषणा करतील अशी शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .
जुलै पासुन डी.ए थकबाकी मिळणार : राज्य कर्मचारी / पेन्शन धारकांना सदर 03 डी.ए वाढ ही माहे जुलै 2024 पासुन लागु होणार असल्याने जुलै पासुनची डी.ए थकबाकीची रक्कम अदा केली जाणार आहे .
- पुढील 03 महिन्यात सोन्याचे भाव गगणाला भिडणार ; जाणून घ्या सविस्तर आकडेवारी !
- Rain Update : पुढील 48 तासात राज्यातील या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी ; जाणून घ्या सविस्तर हवामान अंदाज !
- राज्य कर्मचारी / अधिकारी संदर्भात दि.13 जुन रोजी निर्गमित करण्यात आले 02 महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )
- महाराष्ट्र पेन्शनर्स : पेन्शन धारकांसाठी आत्ताची मोठी अपडेट ; पेन्शनर्स असोसिएशन , पुणे मार्फत प्रसिद्धपत्रक निर्गमित !
- दि.10 जुन 2025 रोजी झालेल्या राज्य मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण कॅबिनेट निर्णय !