@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Pavitra portal teacher recruitment ] : पवित्र पोर्टलद्वारे दुसऱ्या टप्यातील शिक्षक पदभरतीची कार्यवाही बाबत शिक्षण आयुक्तालय मार्फत दिनांक 16 जानेवारी 2025 रोजी महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , पवित्र पोर्टलद्वार पहिल्या टप्यातील पदभरतीची कार्यवाही पुर्ण झालेली असून , दुसऱ्या टप्यातील पदभरती साठी दिनांक 10.11.2022 रोजीच्या शासन निर्णयानुसार पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
सदर दुसऱ्या टप्यातील पदभरती करीता दिनांक 14 जानेवारी 2025 रोजीच्या निर्णयानुसार मंजूरी देण्यात आलेली आहे . यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी व्यवस्थापनांना पोर्टलवर जाहीरात नोंद करण्याची सुविधा दिनांक 20.01.2025 रोजी सुरु करण्यात येणार आहेत .
याशिवाय दुसऱ्या टप्यातील जिल्हा परिषदेकडील उर्वरित असणारी 10 टक्के रिक्त पदे पहिल्या फेरीतील अपात्र , रुजु न झालेले उमेदवार तसेच अपात्र ठरलेले याशिवाय अन्य व्यवस्थापनातील रिक्त जागा इ.बाबींचा विचार करुन जाहीराती द्यावयाची आहे असे नमुद करण्यात आलेले आहेत .
या संदर्भातील पदभरती प्रक्रिया तात्काळ राबविण्याचे निर्देश सदर परिपत्रकानुसार राज्याचे सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक , शिक्षणाधिकारी जिल्हा परिषदा सर्व , पालिका प्रशासन ( शिक्षणाधिकारी – सर्व ) तसेच प्रशासन अधिकारी सर्व यांना देण्यात आलेले आहेत .

- समान काम समान वेतन लागु करुन थकबाकी रक्कम देणेबाबत अखेर शासन निर्णय निर्गमित दि.20.03.2025
- आज दिनांक 20 मार्च रोजीच्या काही प्रमुख चालु घडामोडी ; जाणुन घ्या सविस्तर !
- सरकारी कर्मचाऱ्यांनी सोशल मिडीया वापर करणेबाबत सरकारकडून कठोर नियमावली – मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून निर्देश !
- अवेळी पाऊस यामुळे शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत निधी जाहीर ; GR दि.19.03.2025
- वाहतुकीचे नियम मोडल्यास असे असतील आत्ताचे सुधारित दंड !