राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.05.02.2025 रोजी निर्गमित करण्यात आले 03 महत्वपुर्ण GR ; जाणून घ्या सविस्तर !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ 03 important GRs issued on  05.02.2025 in the case of state employees ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक 05 फेब्रुवारी 2025 रोजी 03 महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत .

01.अधिकारी / कर्मचारी यांचे वेतन अदा करण्यासाठी निधी वितरण : महीला व बाल विकास विभाग मार्फत निर्गमित करण्यात आलेल्या निर्णयानुसार सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरीता एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत कार्यरत अधिकारी / कर्मचारी यांचे वेतन अदा करण्यासाठी निधीचे वितरण करण्यात आलेले आहेत .

माहे जानेवारी चे वेतन अदा करण्यासाठी एकुण 36 कोटी ( अक्षरी – छत्तीस कोटी रुपये इतका ) निधी वितरीत व खर्च करण्यास सदर निर्णयानुसार मान्यता देण्यात येत आहे . तसेच सदर निधी वितरीत करताना अटी व शर्तीचे  काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

02.संचित व अभिवचन रजा नियम : कारागृह अधिनियम याद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन व त्याबाबतीत त्यास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करुन महाराष्ट्र कारागृहे नियम 1959 चे अधिक्रमण करुन मुंबई संचित रजा व अभिवचन रजा नियम 2024 करण्यात आले आहेत .

03.पदोन्नती : गृह विभागांकडून निर्गमित करण्यात आलेल्या निर्णयानुसार राज्य उत्पादन शुल्क विभाग कार्यालयातील अधिक्षक गट क संवर्गातुन सहाय्यक आयुक्त गट –  ब संवर्गात सन 2023-24 च्या नियमित निवडसूचीतून पदोन्नती देण्यास मंजूरी देण्यात आलेली आहे .

वरील नमुद सर्व तिन्ही शासन निर्णय ( GR ) डाऊनलोड करण्यासाठी Click Here

Leave a Comment