राज्य शासन सेवेत कार्यरत शासकीय तसेच कंत्राटी स्वरुपातील अधिकारी / कर्मचाऱ्यांनी कार्यालयात परिधान करावयाच्या पोशाखाबाबत GR !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ GR regarding the attire to be worn in the office by government and contractual officers/employees. ] : सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 08.12.2020 रोजीच्या निर्णयानुसार , राज्यातील सर्व सरकारी कार्यालयांमध्ये कार्यरत सरकारी / कंत्राटी स्वरुपातील अधिकारी / कर्मचाऱ्यांनी परिधान करावयाच्या पोशाखाबाबत महत्वपुर्ण GR निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर निर्णयानुसार नमुद करण्यात आलेले आहेत कि , राज्यातील सर्व अधिकारी / कर्मचारी यांनी दैनंदिन कामकाज दरम्यान पेहराव हा सरकारी कर्मचाऱ्यांना शोभावा अशा प्रकारचा असावा असे नमुद करण्यात आले आहेत . सदरचा परिधान करण्यात आलेला पेहराव हा निटनेटका तसेच स्वच्छ असावा याची दक्षता घेण्याचे निर्देश आहेत .

पुरुष अधिकारी / कर्मचारी करीता : शर्ट , पॅन्ट / ट्राऊझर पॅन्ट असा पेहरावा करावा , यांमध्ये गडद रंगाचे किंवा नक्षिकाम चित्रे / चित्रविचित्र अशा प्रकारचा पेहरावा परिधान करण्यात येवू नयेत असे नमुद आहेत . तर खादीला प्रोत्साहन देण्यासाठी आठवड्यातुन किमान 01 दिवस ( शुक्रवारी ) खादी कपड्याचा पेहरावा करण्याचे सुचित करण्यात आलेले आहेत . पायात बूट , सॅन्डलचा वापर करावा तर स्लिपर्सचा वापर करण्यात येवू नयेत असे नमुद आहे .

महिला अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी : महिला अधिकारी / कर्मचाऱ्यांना साडी , ट्राऊझर पॅन्ट , सलवार / चुडीदार कुर्ता अथवा शर्ट तर आवश्यक असल्यास , दुपट्टा या सारखे पेहरावा करावा असे सुचित करण्यात आलेले आहेत .तसेच पायात चपला , बुट ( शुज ) , सॅन्डल घालावेत .

सदरचा नियम हा राज्यातील सर्व सरकारी / निमसरकारी / महामंडळे / उपक्रमे अंतर्गत कार्यरत सरकारी / निमसरकारी / कंत्राटी तत्वावर कार्यरत कर्मचाऱ्यांना लागु असेल .

Leave a Comment