@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ 03 important GRs issued on 05.02.2025 in the case of state employees ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक 05 फेब्रुवारी 2025 रोजी 03 महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत .
01.अधिकारी / कर्मचारी यांचे वेतन अदा करण्यासाठी निधी वितरण : महीला व बाल विकास विभाग मार्फत निर्गमित करण्यात आलेल्या निर्णयानुसार सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरीता एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत कार्यरत अधिकारी / कर्मचारी यांचे वेतन अदा करण्यासाठी निधीचे वितरण करण्यात आलेले आहेत .
माहे जानेवारी चे वेतन अदा करण्यासाठी एकुण 36 कोटी ( अक्षरी – छत्तीस कोटी रुपये इतका ) निधी वितरीत व खर्च करण्यास सदर निर्णयानुसार मान्यता देण्यात येत आहे . तसेच सदर निधी वितरीत करताना अटी व शर्तीचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
02.संचित व अभिवचन रजा नियम : कारागृह अधिनियम याद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन व त्याबाबतीत त्यास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करुन महाराष्ट्र कारागृहे नियम 1959 चे अधिक्रमण करुन मुंबई संचित रजा व अभिवचन रजा नियम 2024 करण्यात आले आहेत .
03.पदोन्नती : गृह विभागांकडून निर्गमित करण्यात आलेल्या निर्णयानुसार राज्य उत्पादन शुल्क विभाग कार्यालयातील अधिक्षक गट क संवर्गातुन सहाय्यक आयुक्त गट – ब संवर्गात सन 2023-24 च्या नियमित निवडसूचीतून पदोन्नती देण्यास मंजूरी देण्यात आलेली आहे .
वरील नमुद सर्व तिन्ही शासन निर्णय ( GR ) डाऊनलोड करण्यासाठी Click Here
- पुढील 24 तासांमध्ये राज्यातील “या” जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी ; जाणून घ्या सविस्तर अंदाज !
- गिरीश महाजन यांनी डॉ. बाबासाहेबांचे नाव न घेतल्याने , झालेल्या वादावरून माधवी यांचे निलंबन होणार का ? पाहा सविस्तर नियम !
- राज्यातील “या” 15 दिग्गजांना पुरस्कार जाहीर ; जाणून घ्या सविस्तर यादी .
- नविन वेतन आयोगाचे पे – मॅट्रिक्स झाले निश्चित ; जाणून घ्या पगारातील वाढ !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.19.01.2026 रोजी 05 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR) निर्गमित .