राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.21.02.2025 रोजी निर्गमित करण्यात आले 02 महत्वपुर्ण GR ; जाणून घ्या सविस्तर !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ 02 Important GRs issued on 21.02.2025 in the case of State Employees ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक 21 फेब्रुवारी 2025 रोजी 02 महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत . यांमध्ये वेतन व भत्ते व अधिसंख्य पदे निर्माण करणेबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे .

01.वेतन व भत्ते : ग्राहक संरक्षण अधिनियम 2019 अध्यक्ष , जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग यांचे वेतन व भत्ते अदा करणे बाबत निर्णय घेण्यात आलेलला असून , यांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , सहावा वेतन आयोगानुसार 70290-1540-76450 या वेतनश्रेणीत किमान टप्पा प्रतिमहा 70290/- रुपये वेतन 70290/- वेतनवाढीचा दर 1540/- यानुसार ..

डी.ए दर 239 टक्के व वाहतुक भत्ता 2400/- रुपये तर वजाती मध्ये व्यवसाय कर 200/- रुपये आयकर नियमाप्रमाणे व Revenue Stamp साठी 01/- रुपये वजाती करण्यात येईल .

02.अधिसंख्य पदे निर्माण करणेबाबत : अनुसुचित जमाती प्रवर्ग मधून नियुक्त झालेल्या तथापि जात प्रमाणपत्र सादर न केलेल्या अथवा अवैध ठरलेल्या राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या आस्थापनेवरील अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी अधिसंख्य पदे निर्माण करणेबाबत अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांकडून निर्णय घेण्यात आलेला आहे .

सदर अधिसंख्य पदावर कार्यरत असणारे अधिकारी / कर्मचारी यांना प्रथम 11 महिन्यांकरीता तर प्रत्येक वेळी 01 दिवसांचा तांत्रिक खंड देवून पुन्हा 11 महिन्यांच्या कालावधीकरीता त्यांच्या सेवा ह्या सेवानिवृत्तीच्या दिनांकापर्यंत सुरु ठेवण्याचे व यांमध्ये त्यांना पदोन्नती व अनुकंपा धोरणांचा लाभ मिळणार नाही ,असे नमुद करण्यात आलेले आहेत .

या संदर्भातील दोन्ही GR डाऊनलोड करण्यासाठी Click Here

Leave a Comment