@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Features of leave payable and admissible to state employees – Earned leave ] : महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना देय व अनुज्ञेय अर्जित रजेचे नियम ( नियम 50 ) सविस्तर पणे या लेखात जाणून घेवूयात ..
महाराष्ट्र राज्य कर्मचारी रजा सेवा नियमावलीनुसार राज्य कर्मचाऱ्यांना एका कॅलेंडर वर्षांच्या माहे जानेवारी व माहे जुलै महिन्यांच्या 01 तारखेला प्रत्येकी 15 दिवस या प्रमाणे 02 हप्त्यांमध्ये सदर अर्जित रजा कर्मचाऱ्यांच्या खाती जमा करण्यात येते .
सदर रजा ही 300 दिवसांच्या कमाल मर्यादा पर्यंत साठविता येत असते , 300 दिवस झाल्याच्या नंतर पुढील 06 माहिच्या सुरुवातील 15 दिवस याप्रमाणे अनुज्ञेय असतात , परंतु 300+15 असे दाखवावेत व घेण्यात आलेली रजा प्रथम 15 दिवसातुन वजा करण्याचे व 300 दिवसांपेक्षा जास्त शिल्लक राहील तेवढे दिवस व्यपगत होतील ..
मात्र एकाच वेळी सलगपणे 180 दिवस पर्यंतची सदर अर्जित रजा मंजूर करता येत नाही . तसेच प्रत्येक संपुर्ण कॅलेंडर महिन्याला अडीच दिवस दराने सदर अर्जित रजा जमा करण्यात येते .तसेच सेवेचा कॅलेंडर महिना हा पुर्ण नसल्यास तो महिना सोडवायचा नसतो असे नमुद करण्यात आलेले आहेत .
- राज्यातील अनुदानित शाळांना अनुदान वितरीत करण्यास प्रशासकीय मान्यता GR निर्गमित दि.21.03.2025
- अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या गट विमा योजनाच्या वर्गणीबाबत , वित्त विभागांकडून महत्वपुर्ण GR निर्गमित दि.21.03.2025
- आता जादा कामासाठी या शासकीय कर्मचाऱ्यांना अतिरिक्त सुधारित मानधन ; GR निर्गमित दि.21.03.2025
- मार्च पेड इन एप्रिल वेतन देयक अदा करणेबाबत निधीचे वितरण ; शासन निर्णय निर्गमित दि.20.03.2025
- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे अंशदान व शासनाचा हिस्सा व कर्मचाऱ्यांच्या अंशदान यावरील व्याज रक्कम अदा करणेबाबत परिपत्रक दि.11.03.2025