@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ 02 important government decisions were issued on April 21 regarding state employees. ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक 21 एप्रिल 2024 रोजी 02 महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत .
01.वेतन व वेतन बाबीकरीता अनुदानाचे वितरण : महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगास वेतन व वेतन बाबीकरीता सन 2025-26 या आर्थकि वर्षात अनुदान वितरीत करण्यास अल्पसंख्याक विकास विभागाच्या दिनांक 21 एप्रिल 2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात येत आहे .
सदर निर्णयानुसार सामाजिक सुरक्षा व कलयाण , समाज कल्याण , इतर कार्यक्रम , राज्य अल्पसंख्याक आयोग , सहाय्यक अनुदाने या लेखाशिर्ष अंतर्गत एकुण 1,08,68,000/- ( अक्षरी एक कोटी आठ लाख अडुसष्ट हजार रुपये फक्त ) इतकी अर्थसंकल्पीय तरतुद करण्यात आलेली आहे .
02.शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन व वेतनेतर बाबीकरीता लेखाशिर्ष : राज्यातील अशासकीय अनुदानित समाजकार्य महाविद्यालयात ( बी.एस.डब्ल्यु / एम.एस.डब्ल्यू ) अभ्यासक्रम अंतर्गत कार्यरत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन व वेतनेतर बाबींच्या खर्च करीता मागणी क्र.डब्ल्यु 02 ( 22020872 ) या लेखाशिर्षाखाली करण्यास शासन निर्णयांमध्ये नमुद अटींच्या अधीन राहून मान्यता देण्यात येत आहे .
अटी / शर्तींमध्ये नमुद केल्यानुसा , नियमित वेतन खर्च अदायगीबाबत प्रचलित शासन नियम / कार्यपद्धतीचे काटेकोरपणे पालन करण्यात यावेत अशी बाब नमुद करण्यात आली आहे . तसेच रिक्त पदे भरण्यासाठी शासनांची विहीत मार्गाने मान्यता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
तसेच समाजकार्य महाविद्यालयातील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी यांची एचटीई सेवार्थ प्रणालीवर नोंदणी करणे बंधनकारक राहील अशी बाब नमुद करण्यात आलेली आहे . तसेच सदर निर्णयाच्या दिनांकापासुन 02 महिन्यांच्या कालावधीपर्यंत अनुदानित समाजकार्य महाविद्यालयाती शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे वेतन देयके ऑफलाईन पद्धतीने अदा करण्यास सवलत देण्यात येत आहे .
या संदर्भातील दोन्ही शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click Here
- राज्य कर्मचाऱ्यांना 3 वर्षातुन 10 दिवस मिळते या कामासाठी पगारी रजा ; जाणून घ्या वित्त विभागाचा शासन निर्णय !
- जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकरीता महत्वपुर्ण राजपत्र निर्गमित दि.18.07.2025
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा रजेबाबत खास महत्वपुर्ण निर्णय ; संसदेत दिली माहिती !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !