@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ This work will have to be done for the salary of state employees for April 2025; GR issued through the Finance Department ] : राज्य कर्मचाऱ्यांचे माहे एप्रिल 2025 चे वेतन देयक अदा करण्यासाठी कर्मचाऱ्यांचे सेवार्थ प्रणालीमधील विदा ( Data ) अद्ययावत करण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत .
वित्त विभागाच्या दिनांक 09.04.2025 रोजीच्या निर्णयानुसार , नमुद केले आहेत कि , राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन अदा करण्यापुर्वी राज्यातील सर्व अधिकारी / अधिकाऱ्यांच्या सेवार्थ प्रणालीमध्ये विदा सर्वसमावेशक तसेच अद्ययावत करणे आवश्यक असल्याने त्यांमध्ये पुढील 7 बाबी अद्ययावत करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
अ.क्र | अद्ययावत करावयाच्या सात बाबी |
01. | कर्मचाऱ्यांचा मोबाईल क्रमांक |
02. | वैवाहिक स्थिती |
03. | आईचे नाव |
04. | वडीलांचे नाव |
05. | जोडीदाराचे नाव |
06. | पत्ता |
07. | पिन कोड |
वरील सात बाबी सेवार्थ प्रणालीमध्ये अपडेट करण्याचे निर्देश वरील शासन निर्णयानुसार देण्यात आलेले आहेत . याकरीता सेवार्थ प्रणालीमध्ये तशी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे .
यामुळे ज्या आहरण व संवितरण अधिकारी कार्यालयातील कार्यरत असणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांची सदर माहिती ही अपुर्ण असेल , अशा अधिकारी / कर्मचाऱ्यांची सदर माहिती अपडेट करुन घेणे बंधनकारक असल्याचे नमुद करण्यात आले आहे .
सदरचे अपडेशन हे माहे एप्रिल 2025 चे मासिक वेतन अदा करण्यापुर्वी नोंदविणे अनिवार्य असणार आहे .


- 01 जुलै पासुन 04 जुलै पर्यंत राज्यात पावसाची दमदार सुरुवात ; IMD कडून या जिल्ह्यांना तुफान पावसाची शक्यता !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !
- नविन वेतन आयोग किमान फिटमेंट फॅक्टर राज्य कर्मचाऱ्यांचे किमान वेतन Pay Scale नुसार जाणून घ्या , संभाव्य वेतनश्रेणी !
- राज्यातील पेन्शनधारकांसाठी सा. प्र. विभागाचा अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय ( GR) ; जाणून घ्या सविस्तर !