@marathiprasar संगिता पवार प्रतिनिधी [ 02 important Government Decisions (GR) were issued on 13th June regarding State Employees/Officers. ] : राज्य कर्मचारी / अधिकारी संदर्भात दिनांक 13 जुन 2025 रोजी 02 महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत .
01.ग्रामपंचायत कर्मचारी : सन 2025-26 या आर्थिक वर्षांमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतन व भविष्य निर्वाह निधी त्याचबरोबर ग्रामपंचायत सरपंच / उपसरपंच यांच्या मानधन तसेच सदस्य बैठक भत्ता इ. अदा करणे करीता वित्त विभागाने अर्थसंल्पीय तरतुद रुपये 820.56 कोटी इतका निधी माहे एप्रिल मे व जुन या तीन महिन्यांचा खर्च भागविण्यासाठी ..
विभागास उपलब्ध करुन दिल आहे . तसेच सदर निधी संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष पंचायत राज पुणे यांना वितरीत करण्याची बाब शासनांच्या विचाराधीन आहे . सन 2025-26 या आर्थिक वर्षात माहे एप्रिल मे व जुन या कालावधीतील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन , सरपंच , व उपसरपंच यांचे मानधन व सदस्य बैठक भत्ता ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी रक्कम अदा करण्यासाठी सहाय्यक अनुदान रक्कम रुपये 205,14,00,000/- रुपये इतका निधी वितरीत व खर्च करण्यास सदर शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे .
02.वन विभागातील अधिकाऱ्यांना कनिष्ठ प्रशासकीय श्रेणी लागु : भारतीय वन सेवा मधील अधिकाऱ्यांना ( वाटप वर्ष – 2014 , 2015 , 2016 ) कनिष्ठ प्रशासकीय श्रेणी लागु करण्यात येत आहे . यांमध्ये 09 अधिकाऱ्यांना कनिष्ठ प्रशासकीय श्रेणी लागु करण्यात आलेली आहे .
या संदर्भातील दोन्ही GR डाऊनलोड करण्यासाठी Click Here
- राज्य कर्मचाऱ्यांना 3 वर्षातुन 10 दिवस मिळते या कामासाठी पगारी रजा ; जाणून घ्या वित्त विभागाचा शासन निर्णय !
- जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकरीता महत्वपुर्ण राजपत्र निर्गमित दि.18.07.2025
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा रजेबाबत खास महत्वपुर्ण निर्णय ; संसदेत दिली माहिती !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !