@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ 02 separate government decisions issued on 10.06.2025 regarding taking service of retired employees on contract basis and old pension ] : निवृत्त कर्मचाऱ्यांच्या सेवा ह्या करार पद्धतीने घेणे व जुनी पेन्शन बाबत 02 स्वतंत्र शासन निर्णय दिनांक 10.06.2025 रोजी घेण्यात आले आहेत .
01.निवृत्त कर्मचाऱ्यांच्या सेवा करार पद्धतीने घेणे : सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक 10.06.2025 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार , राज्यातील सरकारी / निमसरकारी निवृत्त अधिकाऱ्यांच्या सेवा ह्या करार पद्धतीने विवक्षित कामाकरीता घेण्याची कार्यपद्धती विहीत करण्यात आलेली आहे .
यांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 17.12.2016 , दि.21.02.2018 दि.14.07.2021 , दि.08.09.2023 व दिनांक 23.09.2024 हे शासन निर्णय निर्गमित अधिक्रमित करण्यात आलेले आहेत . सरकारी / निमसरकारी सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या सेवा विषय निहाय एमपॅनलमेंट करुन विवक्षित कामाकरीता करार पद्धतीने उपलब्ध करुन घेता येणार आहेत .
यांमध्ये निवडप्रक्रिया व नियुक्ती , नामिकासुचिची वैधता , एमपॅनलमेंटचा कालावधी , बंधपत्र / हमीपत्र , नियुक्ती आदेश , करार पद्धतीने नियुक्ती द्यावयाच्या व्यक्तिंची संख्या , करार पद्धतीने नियुक्तीची काल मर्यादा , वयोमर्यादा नमुद करण्यात आलेले आहेत .
याशिवाय सक्षम प्राधिकारी ( यांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , गट क व ड संवर्गातून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना करार पद्धतीने नियुक्ती देण्यात येवू नये असे स्पष्ट करण्यात आलेले आहेत . )
वयोमर्यादा / अर्हता : अशा प्रकरणी सदर व्यक्तीच्या वयाच्या 65 वर्षापर्यंत नियुक्ती देता येईल . संबंधित कामाचा 03 वर्षांचा अनुभव आवश्यक , त्याची शारीरिक , मानसिक व आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असणे आवश्यक असेल .
मासिक पारिश्रमिक : निवृत्त अधिकाऱ्यांची विहीत कार्यपद्धतीचे पालन करुन करार पद्धतीने नेमणूक करताना त्यांना अशा नियुक्तीच्या वेळी मिळत असणारे मूळ निवृत्तीवेतन व त्यावरील डी.ए रकमे एवढी रक्कम त्यांच्या मासिक पारिश्रमिक म्हणून निश्चित करण्यात यावे व एकदा निश्चित करण्यात आलेले पारिश्रमिक त्यांच्या करार पद्धतीने नियुक्तीच्या कालावधीकरीता जास्तीत जास्त 03 वर्षे कायम राहील असे नमुद करण्यात आलेले आहेत . या संदर्भातील GR डाऊनलोड करण्यासाठी Click Here
02. जुनी पेन्शन योजना ( old Pension ) : सार्वजनिक बांधकाम विभाग मार्फत निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार श्री.संतोष भोलाजी रोकडे , अधिक्षक अभियंता यांना जुनी पेन्शन योजना लागु करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे . याबाबतचा GR डाऊनलोड करण्यासाठी Click Here
- पुढील 03 महिन्यात सोन्याचे भाव गगणाला भिडणार ; जाणून घ्या सविस्तर आकडेवारी !
- Rain Update : पुढील 48 तासात राज्यातील या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी ; जाणून घ्या सविस्तर हवामान अंदाज !
- राज्य कर्मचारी / अधिकारी संदर्भात दि.13 जुन रोजी निर्गमित करण्यात आले 02 महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )
- महाराष्ट्र पेन्शनर्स : पेन्शन धारकांसाठी आत्ताची मोठी अपडेट ; पेन्शनर्स असोसिएशन , पुणे मार्फत प्रसिद्धपत्रक निर्गमित !
- दि.10 जुन 2025 रोजी झालेल्या राज्य मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण कॅबिनेट निर्णय !