@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Big update for pensioners; Press release issued through Pensioners Association, Pune. ] : राज्यातील पेन्शन धारकांसाठी आत्ताची मोठी महत्वपुर्ण अपडेट समोर येत आहे , ती म्हणजे निवृत्ती वेतन धारक संदर्भात सध्या व्हायरल होत असणाऱ्या मेसेज बाबत महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशन , पुर्ण मार्फत प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आले आहे .
सदर प्रसिद्ध पत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , निवृत्तीवेतन धारकांना आठवा वेतन आयोग व डी.ए वाढ मिळणार नसल्याचे केंद्र शासनांच्या अर्थसंकल्पात सुधारणा असा प्रकारचे मेसेज सोशल मिडियावर दिले जात आहे .
यांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , दिनांक 31.12.2025 च्या अगोदर जे कर्मचारी निवृत्त झाले आहेत , त्यांना यापुढे आठवा वेतन आयोग व डी.ए मध्ये देण्यात येणारी वाढ मिळणान नसल्याचे मेसेज व्हॉट्सॲप वर येत आहेत . त्याचबरोबर दै.लोकमत वर्तमानपत्र मध्ये दिनांक 29.05.2025 रोजी सदर आशयाची बातमी प्रसिद्ध करण्यात आलेली होती .
सदर बातमी व Whasapp वरील बातमीमध्ये तथ्य नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहेत . कारण केंद्र सरकारचे राज्यअर्थ मंत्री पंकज चौधरी यांनी दिनांक 01.05.2025 रोजी मा.श्री.एन षणमुगम खासदार यांना लेखी पत्राद्वारे कळविले आहे कि , भारताच्या एकत्रित निधी मधून पेन्शन देण्यावरील खर्चासाठी सीसीएस पेन्शन नियम व तत्वाच्या प्रमाणीकरण संबंधीचा कायदा , विद्यमान पेन्शन नियमांचे प्रमाणीकरण आहे .
व विद्यमान नागरी अथवा संरक्षण पेन्शन मध्ये बदल अथवा बदल करत नाही .केंद्र सरकारने जानेवारी 2025 मध्ये आठव्या केंद्रीय वेतन आयोगाची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे . आठव्या सीपीसी मध्ये केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन व इतर लाभांशी संबंधित मुद्यांवर योग्य शिफारशी केल्या जाती असे पत्रक दिनांक 01.05.2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत .
तसेच केंद्र सरकारच्या प्रचलित धोरणानुसार केंद्र सरकारने त्यांच्या कर्मचाऱ्यांना वेतन आयोग व महागाई भत्यांमध्ये होणारी वाढ व इतर फायदे देतील ते राज्य शासनाला त्यांचे सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचा-यांना लागु करण्याचे धोरण आहे , त्यामुळे निवृत्तीवेतन धारकांना आठवा वेतन / डी.ए मिळणार नसल्याच्या बातमीवर विश्वास न ठेवण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत .

- 01 जुलै पासुन 04 जुलै पर्यंत राज्यात पावसाची दमदार सुरुवात ; IMD कडून या जिल्ह्यांना तुफान पावसाची शक्यता !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !
- नविन वेतन आयोग किमान फिटमेंट फॅक्टर राज्य कर्मचाऱ्यांचे किमान वेतन Pay Scale नुसार जाणून घ्या , संभाव्य वेतनश्रेणी !
- राज्यातील पेन्शनधारकांसाठी सा. प्र. विभागाचा अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय ( GR) ; जाणून घ्या सविस्तर !