@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : जगांमध्ये 2 अद्भुत घटना घडल्या आहेत , त्यापैकी एक घटना ही भारतातील आहे , भारतातील घटना ही चमत्कारीक असल्याने , सर्वांनाच आश्चर्यचकित करणारी घटना आहे .
यांमध्ये पहिल्या घटनांमध्ये दुबई मध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे , यामुळे तेथील नागरिक पुरांचा सामना करीत आहे , संयुक्त अरब अमिरातीमध्ये दुबई , अबुधाबी अशा मोठ्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात पुर परिस्थिती निर्माण झालेली आहे . दुबईला खुप वर्षानंतर पाऊस पडला आहे , यामुळे सर्वांनाच याचे आश्चर्य वाटत आहे .
दुबई , अबुधाबी अशा शहरांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडत आहे , व पुढील 15 दिवसांमध्ये देखिल पाऊस हजेरी लावणार असल्याचा अंदाज हवामान खात्यांकडून वर्तविण्यात आलेला आहे . दुबई मध्ये कित्येक वर्षानंतर हा पाऊस पडत असून , चक्क पुर स्थिती निर्माण झाली असल्याने हा एक प्रकारचा आश्चर्यच आहे . तर तज्ञांचे मते , संयुक्त अरब अमिरातीमध्ये मानवनिर्मित पाऊस पाडण्याच्या प्रयोगांमुळे हे मुसळधार पाऊस पडत असल्याचे बोलले जात आहेत .
दुसरी घटना म्हणजे भारत देशातील राजस्थान राज्यांमध्ये स्थित बिकानेर या ठिकाणी जमीन ही चक्क 50 फूट खाली बुडाली आहे , तर तज्ञांचे मते एकेकाळी सदर ठिकाणी जमिन अथवा विहिर असल्याचे भाकित करण्यात आले आहेत . सदरची घटना ही दिनांक 16 एप्रिल रोजी रात्रीच्या वेळी घडली आहे , सदरच्या घटनास्थळी कोणत्याही प्रकारची जिवित व वित्त हानी झालेली नाही , या ठिकाणी अनेक जन फोटो , रिल्स बनविण्यासाठी येत आहेत . यामुळे ही घटना चमत्कारीक असल्याचे बोलले जात आहे .
अशाच प्रकारे जमीन ही खाली जात राहील व समुद्र पातळी वाढत जाईल असे अनेकजन बोलले जात आहेत . अशाप्रकारच्या दोन घटना जगांमध्ये घडल्या आहेत .
- कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय खर्चाची प्रतिपुर्ती मंजूर करणेबाबत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.04.12.2025
- कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वपुर्ण “राईट टु डिस्कनेक्ट – 2025” विधेयक लोकसभेत सादर ; कर्मचाऱ्यांना मिळणार मोठा दिलासा !
- दीर्घकालीन सुट्या उपभोगणाऱ्यांना अर्जित रजेचा लाभ ; मा.आ.सुधाकर अडबाले यांच्या प्रयत्नांस यश !
- ताज्या बातम्या : आत्ताची काही प्रमुख चालु घडामोडी !
- देशावर पेन्शन संकट वाढणार ; मिडीया रिपोर्ट !