@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ women low rate loan facility for business ] : राज्य शासनाच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना अंतर्गत महिलांना दहा लाख रुपये पर्यंत गुंतवणुकीची मर्यादा असणाऱ्या प्रकल्प करीता अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येते , याकरिता राष्ट्रीयकृत बँकेचा सहभाग हा 60% असून , अर्जदाराकरिता 5% रक्कम स्वतःचा सहभाग म्हणून भरावयाचा असतो .
बँकेने मंजूर केलेल्या प्रकल्प रकमेच्या एकूण 35% रक्कम महामंडळ मार्फत बीज भांडवल म्हणून देण्यात येते . सदर 35% रकमेवर 4% व्याज आकारण्यात येतो. बीज भांडवल कर्ज योजनेच्या परतफडीचा कालावधी हा 05 वर्षे इतका असून, बँकेने कर्ज वितरित केल्यानंतर त्वरित दुसऱ्या महिन्यापासून महामंडळाच्या बीज भांडवलाच्या वसुली सुरू करण्यात येते . बीज भांडवल वसूल हप्त्याची आगाऊ धनादेश अर्जदारामार्फत घेतले जाते .
सदर योजनेच्या माध्यमातून महिलांना स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी अत्यल्प व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध होते , शिवाय परतफेडी करिता 05 वर्षे इतका कालावधी मिळतो . ज्यामुळे महिलांना सदर योजने अंतर्गत व्यवसाय करण्यासाठी मोठ्या आर्थिक लाभ होतो .
सदर योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे : सदर योजना अंतर्गत लाभ घेण्याकरिता रहिवासी पुरावा , आधार कार्ड, उत्पन्नाचा पुरावा ( यामध्ये उत्पन्नाचा दाखला त्याच्या किंवा पतीच्या नावे असणारे उत्पन्नाचे दाखले ) जातीचा दाखला हे कागदपत्र आवश्यक असतील .
योजनाचा लाभ कसा घेण्यात यावा : सदर योजना अंतर्गत लाभ घेण्याकरिता आपल्या जिल्ह्याच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ कार्यालयास संपर्क साधावा . अथवा mahaswayamrojgar.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने आवेदन सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे .
- SGB : सॉव्हरिन गोल्ड बाँड मधील गुंतवणुकीचा दुहेरी आर्थिक फायदा !
- अजित पवार गट व शिंदे गटातील “या” नेत्यांना पहिल्या यादीत कॅबिनेट मंत्र्याची वर्णी लागणार ; जाणून घ्या संभाव्य यादी..
- कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळांपासुन संरक्षण करण्यासाठी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित दि.02.012.2024
- फेंगल चक्रीवादळामुळे राज्यातील “या” जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता ; जाणून घ्या पंजाबराव यांचा पावसाचा अंदाज !
- तुलशी तंती शिष्यवृती कार्यक्रम 2024-25 मुलींसाठी प्रतिवर्षी 120,000/- रुपये पर्यंत शिष्यवृत्ती ; असा करा अर्ज !