नोकरी करणाऱ्या महिलांसाठी राज्य शासनाची महत्वपूर्ण सखी निवास योजना ; जाणून घ्या सविस्तर .

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ sakhi nivas yojana ] : नोकरी अथवा इतर ठिकाणी व्यवसाय काम करणाऱ्या महिलांसाठी राज्य शासनाकडून खास सखी निवास योजना सुरू केली आहे , ज्यामुळे महिलांना नोकरीसाठी आपल्या मूळ गावापासून इतर ठिकाणी नोकरी , काम , व्यवसाय करण्यासाठी जाणाऱ्या महिलांना निवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते .

विशेषतः महानगरामध्ये काम , व्यवसाय , नोकरी करणाऱ्या ज्या महिलांचे एका महिन्याचे उत्पन्न हे 50,000/- हजार किंवा त्यापेक्षा कमी आहे . अथवा इतर भागांमध्ये ज्या महिलांचे एका महिन्याचे उत्पन्न 35 किंवा त्यापेक्षा कमी आहे . केवळ अशाच महिलांना सदर सखी निवास योजना अंतर्गत निवासाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते .

यामध्ये सदर महिलांना निवासाची उत्तम सुविधा त्याचबरोबर जेवण व त्यांच्या मुलांकरिता पाळणाघराची सुविधा , त्याचबरोबर वैद्यकीय मदत , सुरक्षा इत्यादी प्रकारच्या सुविधा पुरविण्यात येते  . सदर योजना अंतर्गत 18 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वय असलेल्या मुलींना त्याचबरोबर 12 किंवा त्यापेक्षा कमी वय असणाऱ्या मुलांना देखील सदर योजना अंतर्गत निवासाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते . यामध्ये नोकरी करिता प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांना 20% राखीव जागेवर प्रवेश दिला जातो .

सदर योजनेअंतर्गत महिलांना मोफत जेवण निवासाची सुविधा त्याचबरोबर मुलांकरिता पाळणाघराची सुविधा उपलब्ध करून दिली जाते . यामुळे नोकरी करणाऱ्या महिलांना सदर सखी निवास योजना अंतर्गत मोठा लाभ मिळतो .

सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्याकरिता आवश्यक कागदपत्रे : सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्याकरिता अर्जदाराचे रेशन कार्ड , आधार कार्ड , राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र , नोकरीचे नियुक्तीपत्र त्याचबरोबर बँक पासबुक हे कागदपत्र असणे आवश्यक असणार आहेत .

सदर योजनेअंतर्गत मिळणारे लाभ : सदर योजने अंतर्गत एका बेडच्या खोलीकरिता महिलांना एका महिन्याच्या उत्पन्नाच्या 15% म्हणजेच कमाल 1,500/- रुपये इतके भाडे आकारले जाईल . तर दोन बेडच्या खोलीकरिता 70% पर्यंत भाडे आकारले जाईल , तर हॉलमधील बेड करिता 7.5% पर्यंत भाडे आकारले जाईल . त्याचबरोबर पाळणाघर करीता 5% पर्यंत किंवा मुलांकरिता पाळणाघरात झालेला खर्च या दोन्हीपैकी जे कमी असेल ते भाडे आकारण्यात येईल .

अर्ज कुठे कराल : सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्याकरिता जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे सविस्तर अर्ज सादर करावा.

Leave a Comment