@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Weather forecast till March 25: Unseasonal rains will fall in these parts of the state ] : दिनांक 25 मार्च 2025 पर्यंत राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . या काळातील सविस्तर हवामान अंदाज पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .
राज्यांमध्ये सध्या वातावरणात अचानक बदल होताना दिसून येत आहे , कारण काही ठिकाणी कडक उन्हांमुळे पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याने , अवकाळी पावसाची शक्यता निर्माण होत आहे . हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील काही भागांमध्ये दिनांक 25 मार्च दरम्यान अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे .
पुढील 24 तासात विदर्भाला सतर्कतेचा इशारा : पुढील 24 तासामध्ये राज्यातील विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .यांमध्ये विशेषत: भंडारा , गोंदिया , नागपुर , अमरावती , गडचिरोली , यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .
दिनांक 25 मार्च पर्यंत या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता : राज्यात दिनांक 25 मार्च 2025 पर्यंत मध्य महाराष्ट्र तसेच खान्देशातील सांगली , सातारा , पुणे , नगर , नाशिक , सोलापुर , कोल्हापुर या जिल्ह्यांमध्ये तुरळक स्वरुपाचा अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .
या दरम्यानच्या काळात पावसापेक्षा वीजेचा गडगडाट अधिक असणार आहे . तर सदर काळात राज्यात उष्णतेची लाट काहीशी कमी होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे .तर कोकण विभागात तापमान स्थिर राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे .
- राज्य कर्मचाऱ्यांना 3 वर्षातुन 10 दिवस मिळते या कामासाठी पगारी रजा ; जाणून घ्या वित्त विभागाचा शासन निर्णय !
- जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकरीता महत्वपुर्ण राजपत्र निर्गमित दि.18.07.2025
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा रजेबाबत खास महत्वपुर्ण निर्णय ; संसदेत दिली माहिती !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !