राज्यातील अनुदानित शाळांना अनुदान वितरीत करण्यास प्रशासकीय मान्यता GR निर्गमित दि.21.03.2025

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Administrative approval for distribution of grants to aided schools in the state GR issued on 21.03.2025 ] : राज्यातील मान्यताप्राप्‍त असणाऱ्या अनुदानित प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना वेतनेतर अनुदान वितरीत करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत , शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत दिनांक 21 मार्च 2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , राज्यातील मान्यता प्राप्त प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना अटी / शर्तींच्या अधीन राहून 12424.74 लक्ष इतका निधी अनुदान म्हणून मंजूर व मुक्त करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे .

100 टक्के वेतनेतर मध्ये वेतन घेणाऱ्या शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनानुसार , दिनांक 01.04.2008 रोजी देय असलेल्या 5 व्या वेतन आयोगानुसार वेतन अनुदान गोठवून त्या अनुषंगाने 5 टक्के वेतनेत्तर अनुदान देय होईल , तसेच बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 नुसार व मा.सर्वोच्च न्यायालयाच्या निदेशानुसार ,

दिनांक 30.03.2013 पर्यंत भौतिक सुविधा व इतर बाबींची पुर्तता करणाऱ्या शाळांना गुणवत्तेनुसार , सर्वात जास्त पटसंख्या असलेल्या व प्रत्यक्ष सुरु शाळांना प्राधान्य देवून वेतनेतर अनुदान वितरीत करावे असे नमुद करण्यात आले आहेत .

तसेच खाजगी अंशत : पुर्णत : अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या नियत वयोमानानुसार रिक्त झालेल्या पदांच्या प्रमाणात शिपाई भत्ता अदा करण्यासाठी वेतनेतर अनुदान वितरीत करावे असे नमुद करण्यात आले आहेत .

तसेच सदर वेतनेतर अनुदान लेखाशिर्षानिहाय , सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरीता मंजूर तरतुदीमधून , उपलब्ध करुन देण्यात आला आहे .या बाबतचा सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click Here

आपण जर कर्मचारी निवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Comment