अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या गट विमा योजनाच्या वर्गणीबाबत , वित्त विभागांकडून महत्वपुर्ण GR निर्गमित दि.21.03.2025

Spread the love

@marathiprasar बालाजी पवार प्रतिनिधी [ Important GR issued by Finance Department regarding subscription of Group Insurance Scheme of Officers/Employees ] : वित्त विभागाकडून दिनांक 21 मार्च 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार , अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या गट विमा योजनेच्या वर्गणीबाबत , निर्णय घेण्यात आला आहे .

सा.प्र.विभागच्या दिनांक 04 ऑक्टोंबर 2024 रोजीच्या निर्णयानुसार , सा.प्र.विभाग दिनांक 21.12.2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार अधिसंख्‍य पदावर वर्ग करण्यात आलेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या सेवा विषयक / सेवा निवृत्ती विषयक लाभांबाबत निर्णय घेण्यात आला आहे .

सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , अनुसुचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरल्याने सेवामुक्त केलेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 21.12.2019 रोजीच्या निर्णयानुसार अधिसंख्य पदावर नियुक्ती दिल्यानंतर सदर कर्मचाऱ्यांची ती नविन नियुक्ती नसल्याने त्यांना गटविमा योजनेचे नविन सदस्यत्व देण्याची आवश्यकता नाही असे नमुद करण्यात आले आहेत .

तसेच जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे सेवामुक्त / सेवासमाप्त करण्यात आलेल्या दिनांकापासुन सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 21.12.2019 च्या शासन निर्णयानुसार अधिसंख्य पदावर नियुक्ती देण्यात आलेल्या दिनांकापर्यंतचा सेवाखंड कालावधी सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 04.10.2024 रोजीच्या निर्णयानुसार क्षमापित करण्यात आला आहे .

हे पण वाचा : इयत्ता 12 वी / 10 वी पात्रता धारकांसाठी महाभरती 2025 ; लगेच करा आवेदन !

सदर कालावधीत सदर कर्मचारी शासन सेवेत नसल्याने त्यांना विमा संरक्षण नाही म्हणून या कालावधीतील गट विमा योजनेच्या हप्त्यातील केवळ बचत निधीचा हिस्सा समान हप्त्यात वसूल करण्यात यावा असे नमुद करण्यात आले आहेत .

तसेच ज्या दिवसांपासून ते अधिसंख्य पदावर रुजु झाले त्या दिवसापासून त्यांचा गट विमा योजनेचा पुर्ण हप्ता बिना व्याज समान हप्त्यात वसूल करण्यात यावा असे नमुद करण्यात आला आहे .

आपण जर कर्मचारी निवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Comment