@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Despite huge opposition from BJP, 4% reservation for Muslims finally ] : भारतीय जनता पार्टीच्या प्रचंड विरोधानंतरही मुस्लिम समुदायाला 4 टक्के आरक्षण देण्याचा प्रस्तावाला अखेर मंजुरी देण्यात आली आहे .
कर्नाटक विधानसभेत या संदर्भात निर्णय घेतला असून , या राज्यात आता मुस्लिम समुदायाला 4 टक्के आरक्षण लागु करण्यात येत आहेत . शासकीय कंत्राट मध्ये अनुसुचित जाती / अनुसुचित जमाती व ओबीसी कंत्राट बरोबरच मुस्लिम प्रवर्गातील कंत्राटदारांसाठी 4 टक्के आरक्षण लागु करण्याचा विधेयक दिनांक 21 मार्च रोजी विधानसभेत मंजुरी देण्यात आली .
कर्नाटक राज्यातील नागरी कामाकरीता कंत्राट देण्यासाठी अनुसूचित जात / जमाती करीता 24 टक्के तर ओबीसी करीता श्रेणी 1 करीता 4 टक्के तर श्रेणी -2 करीता 15 टक्के आरक्षण दिले जाते . याप्रमाणेच मुस्लिम प्रवर्गाची सदर कंत्राटमध्ये आरक्षण मिळावे याकरीता मागणी करण्यात येत होती , अखेर सदर मागणी पुर्ण करण्यत आली आहे .
हे पण वाचा : 12 वी / 10 वी पात्रता धारकांसाठी महाभरती 2025 ; लगेच करा आवेदन !
सदर विधेकाचा भारतीय जनता पार्टीच्या 18 आमदारांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात विरोध केले , त्यांनी सदर विधेकाच्या प्रति फाडून अध्यक्षकांच्या बाकावर फेकल्याने , विधानसभा अध्यक्ष यू.टी खादर नाराज होवून सदर आमदारांची आमदारकी पुढील 6 महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहेत .
या निर्णयामुळे आता मुस्लिम धर्मीय कंत्राटदारांना शासकीय कंत्राट मध्ये 4 टक्के आरक्षण मिळणार आहेत . हा निर्णय असंवैधानिक दुष्प्रयास असल्याचे वर्णन भारतीय जनता पार्टीकडून करण्यात आले आहेत .
- दिनांक 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या राज्य कॅबिनेट बैठकीत घेण्यात आले 08 महत्वपुर्ण मंत्रीमंडळ निर्णय !
- कर्मचाऱ्यांचे माहे एप्रिल पेड इन मे वेतन करीता अनुदान वितरण GR निर्गमित दि.22.04.2025
- राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सामान्य प्रशासन विभाग मार्फत दि.22 एप्रिल रोजी निर्गमित झाला अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक 21 एप्रिल रोजी निर्गमित झाले 02 महत्वपुर्ण शासन निर्णय !
- राज्य कर्मचाऱ्यांचे एप्रिल 2025 चे वेतनासाठी करावे लागणार हे काम ; वित्त विभाग मार्फत GR निर्गमित !