@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ vidhansabha election duty employee notice ] : विधानसभा निवडणूक कामकाजामध्ये मतदार नोंदवहीत अचूक नोंदी न केल्याने संबंधित केंद्राध्यक्ष , मतदान अधिकारी यांना निवडणूक अधिकारी यांच्या मार्फत नोटीस बजावण्यात आली आहे .
निवडणूक निर्णय अधिकारी चांदवड , यांच्यामार्फत सदर नोटीस बजावण्यात आली असून , सदर मतदान केंद्रातील केंद्र क्रमांक 276 कातरवाडी या मतदारसंघांमध्ये , नियुक्त केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांनी नोंदी चुकीच्या पद्धतीने केल्याचे , निदर्शनास आल्याने संबंधित अधिकारी / केंद्राध्यक्ष यांच्या प्रति कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आले आहे .
यामध्ये केंद्राध्यक्ष डायरीमध्ये मतदान केंद्राचा क्रमांक 276 ऐवजी 306 असं नमूद करण्यात आली आहे , त्याचबरोबर मतदान अधिकारी 02 यांच्यामार्फत 17A डायरीमध्ये ओळखीचा पुरावा म्हणून VIS द्वारे मतदान घेतले गेले आहे , जो की माहिती पुस्तिका मध्ये सदरचा ओळखीचा पुरावा ग्राह्य नाही .
त्याचबरोबर EPIC द्वारे मतदान केल्यांची संख्या व इतर पुरावे दाखवून मतदान केल्याची संख्या यांचा ताळा बसत नसल्याने , सदर संबंधित केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांच्यावर लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 कलम 134 नुसार कार्यवाही का करण्यात येऊ नयेत ? या संबंधित लेखी खुलासा सादर करण्याबाबतचे नोटीस देण्यात आली आहे .
सदरची नोटीस प्रवीण मानसिंग कांबळे मतदान केंद्राध्यक्ष , योगेश वामन गांगुर्डे मतदान अधिकारी क्रमांक 01 , प्रल्हाद दौलत काकळीज मतदान अधिकारी क्रमांक 02 , योगिता सूर्यभान खोब्रागडे मतदान अधिकारी क्रमांक 03 यांच्या प्रति सदर नोटीस निवडणूक निर्णय अधिकारी चांदवड विधानसभा यांच्याकडून सादर करण्यात आली आहे .
- राज्यातील अनुदानित शाळांना अनुदान वितरीत करण्यास प्रशासकीय मान्यता GR निर्गमित दि.21.03.2025
- अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या गट विमा योजनाच्या वर्गणीबाबत , वित्त विभागांकडून महत्वपुर्ण GR निर्गमित दि.21.03.2025
- आता जादा कामासाठी या शासकीय कर्मचाऱ्यांना अतिरिक्त सुधारित मानधन ; GR निर्गमित दि.21.03.2025
- मार्च पेड इन एप्रिल वेतन देयक अदा करणेबाबत निधीचे वितरण ; शासन निर्णय निर्गमित दि.20.03.2025
- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे अंशदान व शासनाचा हिस्सा व कर्मचाऱ्यांच्या अंशदान यावरील व्याज रक्कम अदा करणेबाबत परिपत्रक दि.11.03.2025