@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ job opportunity for b.Ed b.Ed candidate at local school ] : महाराष्ट्र राज्याचे विधानसभा निकाल जाहीर झाल्यानंतर , कंत्राटी पद्धतीने शिक्षक पदभरतीस वेग आला आहे . यामध्ये पात्रता धारक उमेदवारांना स्थानिक शाळेवर मानधन तत्वावर नियुक्ती देण्यात येणार आहे , याबाबत शिक्षणाधिकारी त्यांच्याकडून प्रक्रिया सुरू झाली आहे .
राज्यातील 20 व त्यापेक्षा कमी विद्यार्थी पटसंख्या असणाऱ्या तसेच शिक्षक पदे रिक्त असणाऱ्या शाळेवर कंत्राटी पद्धतीने स्थानिक उमेदवारांची नियुक्ती केली जात आहे . सदर कंत्राटी शिक्षक (contractual teacher requirement ) पदभरती , शालेय शिक्षण विभागाच्या दि. 05.09.2024 रोजीच्या घेण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार (GR) अंमलबजावणी करण्यात येत आहेत.
कंत्राटी शिक्षक पदभरती पात्रता : कंत्राटी तत्वावर शिक्षक पद भरती करिता उमेदवार हे सेवानिवृत्त शिक्षक किंवा B. Ed , D.Ed अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल , त्याचबरोबर सदर उमेदवार हा स्थानिक असणे आवश्यक असणार आहे . याकरिता स्थानिक असले बाबत रहिवाशी ( domicile certificate ) प्रमाणपत्र सादर करावे लागेल .
कंत्राटी शिक्षकास मिळणारे मानधन : सदर कंत्राटी तत्वावर नेमणूक करण्यात आलेल्या शिक्षकास दरमहा पंधरा हजार रुपये मानधन दिले जातील , याशिवाय इतर कोणतेही भत्ते , वेतन अदा केले जाणार नाहीत . याशिवाय सदर शिक्षकास वर्षातून 12 रजा अनुज्ञेय होतील , या व्यतिरिक्त रजा विनावेतन ग्राह्य धरण्यात येतील .
राज्यामध्ये शिक्षकांचे अनेक पदे रिक्त आहेत , अशा रिक्त पदावर कंत्राटी तत्वावर सेवानिवृत्त शिक्षक तसेच स्थानिक पात्रताधारक उमेदवारांमधून मानधन तत्वावर शिक्षकांची तात्पुरत्या स्वरूपात नेमणूक केली जात आहे .

- जुनी पेन्शन , शिक्षण सेवक रद्द करा आदी मागणीसाठी धरणे आंदोलन ; जाणून घ्या सविस्तर वृत्त !
- आगाऊ वेतनवाढी मंजूर करणेबाबत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ; GR दि.17.03.2025
- राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना घरबांधणी अग्रिम व मोटार वाहन खरेदी अग्रिम वाटप करणेबाबत महत्वपुर्ण 02 GR निर्गमित !
- महाराष्ट्र राज्य शासनामार्फत खास शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येतात ह्या महत्वपुर्ण योजना 2025
- आठवा वेतन आयोग व महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी ; जाणून घ्या काही महत्वपुर्ण बाबी !