NPS कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण / लाभदायक शासन निर्णय निर्गमित दि.24.02.2025

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Very important / beneficial government decision for NPS employees issued on 24.02.2025 ] : राष्ट्रीय पेन्शन योजना / परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या बाबतीत शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत दिनांक 24 फेब्रुवारी 2025 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

वित्त विभाग दिनांक 31.03.2023 रोजीच्या निर्णयान्वये दिनांक 01 नोव्हेंबर 2005 रोजी व त्यानंतर राज्य शासन सेवेत नियुक्त झालेल्या व परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना / एनपीएस प्रणाली लागु असणाऱ्या कर्मचाऱ्याचा सेवेत असतांना मृत्यु झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन व मृत्यु उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तीवेतन व सेवानिवृत्त ..

उपदान तसेच शासन सेवेतुन निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवा उपदान लागु करण्यात आले आहेत .सदर आदेश मान्यता प्राप्त तसेच अनुदानित अशासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील कर्मचाऱ्यांना योग्य त्या फेरफारांसह लागु करण्यात आलेले आहेत . या संदर्भात शालेय शिक्षण विभाग मार्फत दिनांक 14.06.2023 रोजी स्वतंत्र शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर शासन शुद्धीपत्रकानुसार , शासन निर्णय दिनांक 14.06.2023 च्या परिच्छेद क्र.01 मधील बाब – दिनांक 01 नाव्हेंबर 2005 रोजी व त्यानंतर राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक , माध्यमिक / उच्च माध्यमिक , जिल्हा परिषदा व अध्यापक विद्यालयातील 100 टक्के अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेत्तर ( Teaching and non Teaching Staff ) कर्मचारी व परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा सदस्य आहे अशा .. या ऐवजी खालीलप्रमाणे बदल ..

वरील परिच्छेद ऐवजी असा बदल : दिनांक 01.11.2005 रोजी व त्यानंतर राज्यातील जिल्हा परिषदा , तसेच मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक , माध्यमिक / उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील 100 टक्के अनुदानित पदावरील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी व परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या तरतुदी लागु असलेल्या शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना असा बदल करण्यात येत आहे .

आपण जर कर्मचारी निवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Comment