@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Dam Satyagraha of state employees on 06.03.2025 for this pending demand ] : राज्याच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या अनुषंगाने राज्यातील सरकारी कर्मचारी / शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी प्रलंबित मागणीसाठी आक्रमक झाले आहेत . या प्रलंबित मागण्या पुर्ण व्हावेत याकरीता दिनांक 06.03.2025 रोजी धरण सत्याग्रहाचे आयोजन करण्यात आलेले आहेत .
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना , महाराष्ट्र ही संघटना ही शासन मान्यताप्राप्त कर्मचारी संघटना आहे . या संघटनेच्या वतीने वेळोवेळी कर्मचाऱ्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडले आहेत , शिवाय पेन्शन प्रणालीवर याच संघटनेच्या वतीने तोडगा काढण्यात आला आहे . सदर संघटनेच्या वतीने दिनांक 06 मार्च 2025 रोजी धरण सत्याग्रहाचे आयोजन करण्यात आलेले आहेत .
हे धरण सत्याग्रह हे राज्यव्यापी स्वरुपाचे असणार आहे , यांमध्ये राज्यातील तब्बल 17 लाख सरकारी कर्मचारी सहभागी घेतील अशी संघटनेची अपेक्षा आहे . संघटनेच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , राज्य कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे मागील 03 महिन्यांपासुन राज्य शासनांकडून दुर्लक्ष केले जात आहेत .
नव्याने स्थापन झालेल्या सरकार सध्या भक्कम पायावर उभे राहले असून 100 दिवसांच्या कार्यकृती कार्यक्रमांमध्ये गुंतले आहे , अशात सरकारी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित मागण्या म्हणजे सुधारित पेन्शनचा प्रश्न दिनांक 01 मार्च 2024 च्या अंमलबजावणी दिनांकापासुन सोडविल्याचे घोषित करण्यात आले .
परंतु त्या संदर्भातील कार्यपद्धती व नियम विषद करणारे परिपत्रक तसेच शासन निर्णय अद्याप निर्गमित झालेले नाहीत , यामुळे दिनांक 01.03.2024 नंतर सेवानिवृत्त झाले आहेत असे , कर्मचारी पेन्शन पासुन वंचित आहेत .तसेच दिनांक 01.07.2024 पासुन केंद्रीय कम्र्चारी प्रमाणे 03 टक्के वाढीव डी.ए राज्य कर्मचाऱ्यांना लागु करण्याच्या शाश्वत धोरणाला बाधा करुन गेले 08 महिने उलटले तरी देखिल सदर डी.ए वाढीचा निर्णय अद्याप शासनांकडून घेण्यात आलेला नाही .
अशा प्रमुख मागणींकरीता दिनांक 06 मार्च 2025 रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर 02 तास धरण सत्याग्रहाचे आयोजन करण्यात आले आहेत .
आपण जर कर्मचारी निवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !
- जुनी पेन्शन , शिक्षण सेवक रद्द करा आदी मागणीसाठी धरणे आंदोलन ; जाणून घ्या सविस्तर वृत्त !
- आगाऊ वेतनवाढी मंजूर करणेबाबत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ; GR दि.17.03.2025
- राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना घरबांधणी अग्रिम व मोटार वाहन खरेदी अग्रिम वाटप करणेबाबत महत्वपुर्ण 02 GR निर्गमित !
- महाराष्ट्र राज्य शासनामार्फत खास शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येतात ह्या महत्वपुर्ण योजना 2025
- आठवा वेतन आयोग व महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी ; जाणून घ्या काही महत्वपुर्ण बाबी !