अधिकारी / कर्मचाऱ्यांचे आधार बेस्ड उपस्थिती (हजेरी) प्रणाली ( AEBAS ) मध्ये येत आहेत “या ” अडचणी !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ There are many problems facing the Aadhaar Based Attendance System (AEBAS) of officers/employees. ] : राज्यातीलच नव्हे तर देशातील अधिकारी / कर्मचाऱ्यांची उपस्थिती ही आधार बेस्ड प्रणालीद्वारे ( AEBAS ) द्वारे घेण्यात येत आहेत . परंतु या प्रणालीद्वारे हजेरी लावत असताना , अनेक प्रकारच्या अडचणी येत आहेत .

.

काही अधिकारी / कर्मचाऱ्यांची नोंदणीच नाही : या प्रणालीमध्ये काही अधिकारी / कर्मचाऱ्यांची ऑनलाईन पद्धतीने नोंदणीची झाली नाही . ज्यांमध्ये ज्यांचे आधार कार्ड अपडेट नाही ( नावात / जन्म तारीखमध्ये बदल ) , तसेच काहींचे आधारकार्ड व मोबाईल नंबर अगोदरच नोंदविण्यात आलेले आहेत , अशा प्रकारच्या अडचणी येत आहेत .

ऑनलाईन हजेरी लावताना प्रारंभिक व समापन स्थितीतील अडचणी : यांमध्ये हजेरी करताना प्रारंभिक स्थिती केल्यास , परत फेस कॅप्चर केल्यास समापन होते . यामुळे हजेरी लावताना अडचणी येत आहेत .

हजेरी झाली कि नाही याबाबत स्पष्टता नाही : सदर आधार बेस ॲप्स मध्ये फेस घेतल्यानंतर प्रारंभिक ( IN ) केल्यानंतर , काही सेकंदात प्रारंभिक अथवा समापन स्थिती दर्शविणारा डिस्प्ले दिसतो . यामुळे हजेरी झाल्याची स्पष्टता कर्मचाऱ्यांना होत नाही .यामुळे कर्मचारी लॉगिनला याबाबत स्पष्टता होणे आवश्यक आहे .

हे पण वाचा : राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.07.04.2025 रोजी निर्मित झाला अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय !

जुन्या व्हर्जनच्या मोबाईल मध्ये वर्क करत नाही : आधार फेस प्रणाली हे जुन्या व्हर्जनच्या मोबाईल मध्ये वर्क करत नसल्याने , ज्यांच्याकडे जुन्या व्हर्जनचे ( 3G ) मोबाईल वरुन आधार फेस हजेरी करण्यास अडचणी आहेत .

वेळ खाऊ प्रक्रिया : शहरी भागांमध्ये नेटवर्क चांगले असल्याने , शहरी भागात ह्या प्रणाली अंतर्गत हजेरी नोंदविण्यासाठी वेळ लागत नाही . परंतु ग्रामीण भागांमध्ये ह्या प्रणाली द्वारे हजेरी नोंदविण्यासाठी 2-5 मिनिटांचा अवधी लागत आहे . तर कधी कधी स्लो नेटवर्क मुळे हजेरी होत नसल्याच्या कर्मचाऱ्यांच्या तक्रारी आहेत .

Leave a Comment