शेतकऱ्यांसाठी सर्वाधिक फायदेशिर तुती लागवड अनुदान योजना ; जाणून घ्या व मिळवा !

Spread the love

@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ Mulberry cultivation subsidy scheme, which is the most beneficial for farmers; know and get it. ] : शेतकऱ्यांना तुती लागवडीकरीता अनुदान देण्यात येते , सदर योजना बाबत सविस्तर माहिती या लेखांमध्ये जाणुन घेवूयात ..

तुती लागवड अनुदान योजना : शेतकऱ्यांना तुती लागवड करीता नविन शेतकऱ्यांना 500/- रुपये भरुन तुती लागवड करीता नोंदणी करुन सभासद होता येते . अशा शेतकऱ्यांना अंडीपुंज अनुदान योजना , प्रशिक्षण , सिल्कसमग्र योजना अंतर्गत लाभ मिळतो.  याशिवाय म.न.रे.गा या योजना अंतर्गत देखिल लाभ मिळवता येते .

प्रति लाभार्थी 1 एकर या प्रमाणे लाभ मिळेल , लाभार्थी निवड करीता सामाजिक आरक्षणाचा विचार केला जाईल . मनरेगा योजना अंतर्गत 3 वर्षांकरीता अकुशल मजुरी करीता 2,65,815/- रुपये तर कुशल मजुरी करीता 1,53,000/- रुपये अशी एकुण 4,18,515/- रुपये रक्कम दिले जाते .

तर सिल्कसमग्र योजना अंतर्गत तुती लागवड , किटक संगोपन गृह , सिचंन संच , कीटक संगोपन साहित्य , निर्जुंतुकीकरण करीता प्रति एकर 3,75,000/- तर अनुसुचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी 4,50,000/- रुपये अनुदान दिले जाते .

अनुदानाचा लाभ कसा घ्यावा : सदर योजनांचा लाभ घेण्याकरीता आपल्या जिल्ह्याच्या जिल्हा रेशीम कार्यालय , मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयास भेट द्यावे .

Leave a Comment