@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ The option form should not be filled without receiving GPS scheme guidelines. ] : सुधारित पेन्शन योजनाच्या मार्गदर्शक सुचना आल्याशिवाय विकल्प नमुना भरु नयेत असे , महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे अकोला येथे झालेल्या सहविचार सभेत पदाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना सुचित केले आहेत .
सन 2005 नंतर / एनपीएस धारक कर्मचाऱ्यांना सुधारीत प्रणाली प्रणाली यांमध्ये राज्य सरकारची सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना किंवा केंद्र सरकारची एकीकृत पेन्शन योजना यापैकी एका पेन्शन योजना स्विकारण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे . परंतु या दोन्ही पेन्शन योजनांमध्ये कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे लाभ मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांकडून सदर पेन्शन योजनांस विरोध होत आहे .
केंद्र सरकारची युपीएस व राज्य शासनांने लागु केलेली जीपीएस पेन्शन प्रणाली यापैकी एका पेन्शनची निवड करण्याचा विकल्प हा दिनांक 31.03.2025 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे . परंतु महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे नुकतेच अकोला येथे झालेल्या राज्य कार्यकारणी सहविचार सभेत संघटनेचे पदाधिकारी संजय सोनार कळवाडीकर यांनी ..
कर्मचाऱ्यांना संबोधित करताना सांगितले कि , जीपीएस पेन्शन योजनांच्या मार्गदर्शक सुचना निर्गमित झाल्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या विकल्प नमुना भरु नयेत , असे नमुद करण्यात आले आहेत . .
याशिवाय विकल्प नमुना भरण्यासाठी मुदवाढ देण्याकरीता संघटनेच्या वतीन पाठपुरावा करण्यात येणार आहेत , यामुळे विकल्प नमुना भरण्याची कोणतीही घाई करु नयेत असे आवाहन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहेत .
- शैक्षणिक वर्ष 2025-26 पासुन 4 वर्षीय बी.ए/बी.एस्सी बी.एड बंद करुन नविन 4 वर्षीय ITEP अभ्यासक्रम सुरु करणेबाबत परीपत्रक ..
- आज दिनांक 11 मार्च रोजीच्या काही प्रमुख चालु घडामोडी ; जाणून घ्या सविस्तर !
- महाराष्ट्र अर्थसंल्पातील काही महत्वपुर्ण बाबी ; या कामासाठी विशेष निधीची तरतुद !
- काही किरकोळ आजार व त्यावरील घरगुती उपाय ; 100 टक्के फायदेशिर !
- मुक्त विद्यापीठातुन “या” पदव्या करता येणार ऑनलाईन पद्धतीने ; परीक्षाही ऑनलाईनच !