@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ 06 important cabinet decisions were taken in the cabinet meeting held on 18.02.2025. ] : दिनांक 18 फेब्रुवारी 2025 रोजी झालेल्या कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठकीत 06 महत्वपुर्ण दिलासादायक कॅबिनेट निर्णय राज्याचे मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले आहेत .
01.म्हैसाळ उपसा सिंचन योजनाची अंतर्गत कार्यक्षमता वाढविण्यासाठी 1,594 कोटींची मान्यता : कृष्णा – कोयना या उपसा सिचंना योजना अंतर्गत अस्तित्वात असणारे म्हैसाळ उपसा सिचंन योजना करीता सौर उर्जा प्रकल्पाची उर्जा कार्यक्षमता सुधारकरीता तब्बल 1,594/- कोटी रुपयांची मान्यता देण्यात आली आहे .
02.लोंढे बॅरेज प्रकल्प करीता निधीची तरतुद : जळगाव जिल्हा मधील वरखेडे लोंढे बॅरेज मध्यम प्रकल्प करीता तब्बल 1,275 लाख रुपयांची तरतुद करण्यात आलेली आहे .सदर निधी खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे .
03.अंमली पदार्थ टास्क फोर्स : राज्यांमध्ये अंमली पदार्थ टास्क फोर्स करीता 364 पदांना त्याकरीता खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे . यांमध्ये 310 हे नियमित पदे असतील तर 36 पदे बाह्य यंत्रणा द्वारे तर यांमध्ये नियमित पदांचा तपशिल पुढीलप्रमाणे असेल , यांमध्ये विशेष पोलिस महानिरीक्षक 01 , उपनिरीक्षक 01 , पोलिस अधिक्षक 03 , अपर पोलिस अधिक्षक 03 , पोलिस अधिक्षक 10 , पोलिस निरीक्षक 35 , पोलिस हवालदार 48 , पोलिस शिपाई – 83 ,चालक पोलिस हवालदार – 18 , तसेच चालक पोलिस शिपाई – 32 , कनिष्ठ लिपिक – 07 , उच्च श्रेणी लघुलेखक – 02 , निम्न श्रेणी लघुलेखक -3 अशा पदांचा समावेश असेल .
04. 6 व्या वित्त आयोगाची स्थापना : 6 व्या राज्य वित्त आयोगाची स्थापना करण्यास सदर मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे . सदर आयोग दि.01.04.2026 ते 31.03.2031 या 05 वर्षे कालावधी करीता शिफारशी करतील .
05. पुणे जिल्ह्यातील दीनानाथ मंगेशकर दवाखान्याला नाल्यावरील पुलाच्या बांधकाम करीता जमीन उपलब्ध करुन देण्यात मान्यता .
06.राज्यामध्ये रोप -वेची कामे करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे .याकरीता आवश्यक असणाऱ्या ठिकाणी 30 वर्षे भाडेतत्वावर कामे करण्यास NHLML या यंत्रणेला मान्यता देण्यात आलेली आहे .
- समान काम समान वेतन लागु करुन थकबाकी रक्कम देणेबाबत अखेर शासन निर्णय निर्गमित दि.20.03.2025
- आज दिनांक 20 मार्च रोजीच्या काही प्रमुख चालु घडामोडी ; जाणुन घ्या सविस्तर !
- सरकारी कर्मचाऱ्यांनी सोशल मिडीया वापर करणेबाबत सरकारकडून कठोर नियमावली – मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून निर्देश !
- अवेळी पाऊस यामुळे शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत निधी जाहीर ; GR दि.19.03.2025
- वाहतुकीचे नियम मोडल्यास असे असतील आत्ताचे सुधारित दंड !