राज्य कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी महिन्यात मिळणार हे 3 लाभ ; जाणून घ्या सविस्तर !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ State employees will get these 3 benefits in February ] : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत बऱ्याच दिवसांपासुन प्रलंबित असणाऱ्या मागणींवर या महिन्यात निर्णय होवू शकतील .

01.निवृत्तीचे वय : राज्य कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे केंद्र सरकार व इतर 25 घटक राज्य तसेच राज्यातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी व आखिल भारतीय सेवेतील अधिकारी प्रमाणे 60 वर्षे करण्याची मागणीची दखल घेण्यात आलेली असून , मा.सचिवांकडून सदर मागणीवर मंत्रीमंडळाच्या मंजूरीसाठी शिफारस करण्यात आलेली आहे .

02.वाढीव डी.ए : राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर 03 टक्के वाढीव महागाई भत्ता अनुज्ञेय करणे अद्याप प्रलंबित आहे . महागाई भत्ता वाढीचा प्रस्ताव देखिल तयार असुन ,मा.मुख्यमंत्री यांच्या मंजूरीसाठी पाठविण्यात आलेला असल्याची माहिती समोर आली आहे .

03.घरभाडे भत्ता (HRA ) : सातवा वेतन आयोगातील तरतुदीनुसार महागाईचे दर हे 50 टक्के अधिक होईल , त्या वेळी घरभाडे भत्ता मध्ये देखिल वाढ अपेक्षित आहे . तर राज्य कर्मचाऱ्यांना माहे जुलै 2024 पासुन 3 टक्के डी.ए वाढ होणार असून , त्यामुळे एकुण महागाई भत्ताचे दर हे 53 टक्के म्हणजेच 50 टक्के पेक्षा अधिक होणार आहे .

ज्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना वित्त विभागाच्या शासन निर्णयानुसार सुधारित घरभाडे भत्ता ( वास्तव्याच्या ठिकाणानुसार 30 टक्के , 20 टक्के , 10 टक्के ) लागु करण्यात येणार आहेत .

Leave a Comment