आधार बायोमेट्रीक फेस रिडिंग हजेरी राज्यातील कर्मचाऱ्यांचा विरोध ; जाणून घ्या सविस्तर वृत्त !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ State employees oppose Aadhaar biometric face reading attendance; know the detailed news. ] : मागील महिन्यांपासुन देशातील सरकारी / निमसरकारी कर्मचाऱ्यांसाठी आधार बायोमेट्रिक फेस रिडींग हजेरी कार्यान्वित करण्यात आलेली आहे .

सदर बायोमेट्रिक फेस रिडींगसाठी कर्मचाऱ्यांकडून विरोध दर्शविण्यात येत आहे . कारण सदर हजेरी अनेक प्रकारच्या तांत्रिक अडचणी आहेत , त्या समस्यांचे निकारण करण्याच्या सुचना देखिल कर्मचाऱ्यांकडून दिल्या जात आहेत .

दिनांक 07 एप्रिल या जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने रायगड जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी बायोमेट्रिक फेस रिडींग हजेरी मधील दोष व वापरण्यास चुकीचे असल्याच्या तक्रारी बाबत निवेदन देण्यात आले . यांमध्ये कर्मचाऱ्यांना हजेरी नोंदवताना येणारे अनेक तक्रारी नमुद करण्यात आल्या आहेत .

या तक्रारीमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , अतिरिक्त पदाचा कार्यभार सांभाळताना सदर प्रणालीचा वापर कसा करावा . तसेच काम संपल्याच्या नंतर सदर प्रणालीमध्ये आऊट केले जाते , परंतु अचानक कामावर परत यायचे असल्यास परत सदर प्रणालीचा वापर कसा करायचा असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडत आहे .

हे पण वाचा : ग्रंथपाल , शिक्षक , लेखापाल , लिपिक ,शिपाई , चालक , सफाई कामगार इ. पदांसाठी मोठी पदभरती !

आरोग्य कर्मचाऱ्यांचे कामाचे तास निश्चित नसल्याने , सदर प्रणालीचा वापर करणे चुकीचे असल्याचे नमुद करण्यात आले आहेत . यामुळे रायगड जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांकडून सदर प्रणालीवर सक्तीने हजेरी नोंदविण्यात येणार नसल्याची बाब नमुद करण्यात आलेली आहे .

याबाबत जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी निवेदनातील बाबी समजुर घेवून याबाबत राज्य शासनांस पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहेत .

Leave a Comment