@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Free medical treatment for poor and needy patients; Know more about the government’s charity scheme. ] : निर्धन रुग्ण व गरीब रुग्णांसाठी मोर्फत वैद्यकीय उपचार करीता सरकारच्या धर्मदाय योजना मधून मोफत / 50 टक्के सवलतीच्या दरांमध्ये वैद्यकीय उपचार मिळते . या योजना बाबत सविस्तर माहीती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
योजना उद्देश : धर्मदाय या योजनांच्या माध्यमातुन महाराष्ट्र राज्यातील धर्मदाय रुग्णालयांमध्ये निर्धन व गरीब रुग्णांना मोफत व सवलतीच्या दरांमध्ये उपचार दिले जाते . त्याकरीता विशिष्ट उत्पन्न मर्यादाची अट लागु आहे .
निर्धन रुग्ण : निर्धन रुग्ण करीता सदर धर्मदाय योजना अंतर्गत लाभ घेण्याकरीता कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा ही 1,80,000/- रुपये इतकी आहे अशा निर्धन रुग्णांना मोफत वैद्यकीय उपचार सदर धर्मदाय रुग्णालयांमध्ये दिले जाते .
गरीब रुग्ण : गरीब रुग्णांसाठी सदर योजना अंतर्गत लाभ घेण्याकरीता कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा ही 1,80,000/- ते 3,60,000/- रुपये इतकी असणे आवश्यक असेल . अशा गरीब रुग्णांकरीता सदर योजना अंतर्गत 50 टक्के सवलतीच्या दरांमध्ये वैद्यकीय उपचार दिले जाते .
योजनांचा लाभ घेण्याकरीता आवश्यक कागदपत्रे : सदर योजनांकरीता लाभ घेण्याकरीता रुग्णाचा / नातेवाईकाचा अर्ज , आधार कार्ड , रेशनकार्ड , तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला , डॉक्टरांचे प्रिस्क्रीप्शन अथवा अंदाजपत्रक आवश्यक असणार आहेत .
अर्ज कसा करावा : सदर योजना अंतर्गत लाभ घेण्याकरीता www.charityhelp.dcmo@maharashtra.gov.in या संकेतस्थळावर आवेदन सादर करायचे आहेत . अथवा याबाबबत अधिक माहितीकरीता 18001232211 / 9321103103 या नंबरवर संपर्क करु शकता ..
- नविन वेतन आयोगाचे पे – मॅट्रिक्स झाले निश्चित ; जाणून घ्या पगारातील वाढ !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.19.01.2026 रोजी 05 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR) निर्गमित .
- राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीच्या वयात वाढ नाहीतर , 02 वर्षांनी कमी करणेबाबत GR निर्गमित दि.17.01.2026
- राज्य कर्मचाऱ्यांच्या रजा नियमांमध्ये सुधारणा ; वित्त विभाग शासन अधिसूचना दि.28.01.2025
- राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.31 डिसेंबर रोजी निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय !