@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ state employee January payment anudan gr ] : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांचे माहे जानेवारी वेतन व भत्ते देयके अदा करणेकामी निधींचे वितरण करणेबाबत ग्राम विकास विभाग मार्फत दिनांक 24 जानेवारी 2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदरच्या निर्णयानुसार , नमुद करण्यात आलेले आहे कि , अधिकारी / कर्मचारी यांचे वेतन व भत्ते अदा करणेकरीता प्रतिमाह वेतनांसाठी सरासरी खर्च व त्यांच्याकडील शिल्लक निधी विचारात घेवून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमधील अधिकारी / कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते अदा करणेकरीता रुपये 5,25,00,000/- ( अक्षरी पाच कोटी पंचवीस लाख रुपये फक्त ) इतका निधी संबंधित मुख्य कार्यकारी जिल्हा परिषद यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून अर्थसंकल्पिय वितरण प्रणालीवर .
सदर अनुदान हे ग्राम विकास विभागाच्या मागणी क्र.एल – 3 , 2515 – इतर ग्रामीण विकास कार्यक्रम , 00-104 – जिल्हा ग्रामीण विकास अभिकरण – प्रशासन , जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा – प्रशासकीय खर्च राज्य पुरस्कृत योजना या लेखाशिर्षांतर्गत सन 2024-25 च्या तरतुदींमधून भागविण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
सदर निर्णयांमध्ये नमुद केल्याप्रमाणे , निधींचे वितरण करण्यात आलेले आहेत . जिल्हानिहाय वितरीत करण्यात आलेल्या निधी तपशिल सदर शासन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आलेला आहे .
या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click Here
- राज्य कर्मचाऱ्यांना 3 वर्षातुन 10 दिवस मिळते या कामासाठी पगारी रजा ; जाणून घ्या वित्त विभागाचा शासन निर्णय !
- जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकरीता महत्वपुर्ण राजपत्र निर्गमित दि.18.07.2025
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा रजेबाबत खास महत्वपुर्ण निर्णय ; संसदेत दिली माहिती !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !