@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ state all school timeing news ] : राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या शाळांच्या वेळा बाबत राज्य शासनांकडून महत्वपुर्ण निर्देश देण्यात आलेले आहेत . सदरच्या वेळा ह्या राज्यातील इयत्ता चौथी पर्यंतच्या वर्गांकरीता लागु असणार आहेत .
यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून राज्यातील सर्वच व्यवस्थापनाच्या इयत्ता 4 थी पर्यंतच्या शाळा ह्या 9 वाजता अथवा त्यानंतरच भरविण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . यांमध्ये पुर्व प्राथमिक वर्गांकरीता (नर्सरी , एलकेजी ,युकेजी ) सदर नियम लागु असणार आहेत , शिक्षणांसाठी लहान मुलांची झोपमोड होवू नयेत , हा प्रमुख उद्देश डोळ्यांसमोर ठेवून , सदरचा निर्णय राज्य शासनांकडून घेण्यात आलेला आहे .
9 नंतर शाळा भरण्याचे कारणे : राज्याचे राज्यपाल यांनी एका भाषणांमध्ये नमुद केल्याप्रमाणे सध्याच्या आधुनिक युगांमध्ये आपल्या जीवन शैलीत अमुलाग्र असे बदल झालेले आहेत .सध्या मनोरंजनाचे आधुनिक साधने उपलब्ध झालेले आहेत , बहुदा शहरी भागांमध्ये मुले ध्वनीप्रदुषण अशा समस्यांमुळे रात्री उशिरापर्यंत झोपत नाहीत , तर शाळा ह्या सकाळच्या वेळांमध्ये असल्यास विद्यार्थ्यांची झोप मोड होवून मानसिक आरोग्यावर अनेक परिणाम होतात .
यामुळे राज्यातील सर्वच जिल्ह्यातील तसेच सर्वच व्यवस्थापनांच्या ( शासकीय , निमशासकीय , अनुदानित , विना अनुदानित ) अशा सर्व प्रकारच्या शाळांच्या वेळा ह्या सन 2024-25 या शैक्षणिक वर्षांपासुन पुर्व प्राथमिक ते इ. 4 थी पर्यंतचे वर्ग हे सकाळी 9 वाजता अथवा त्यानंतर भरविण्याचे निर्देश राज्य शासनांकडून देण्यात आलेले आहेत .
तर ज्या शाळांना आपल्या वरील वर्गांकरीता वेळांमध्ये बदल करणे शक्यच नसतील तर आपल्या अडचणींबाबतचा सविस्तर प्रस्ताव संबंधित जिल्हा शिक्षणाधिकारी यांच्याकडे सादर करावा , त्यांच्या पुर्व परवानगी शिवाय वरील नमुद वर्ग हे 9 पुर्वी भरविण्यात येवू नयेत , अशा प्रकारचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
-
शिक्षकांसाठी धक्कादायक बातमी ; टीईटी परीक्षा दि.31.08.2026 पर्यंत उत्तीर्ण व्हावीच लागणार – विधी व न्याय विभागाचा अभिप्राय !

Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ TET exam must be passed by 31.08.2026. ] : टीईटी परीक्षा संदर्भात आत्ताची मोठी धक्कादायक बातमी समोर येत आहे . सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात . टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे याबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे . यामुळे यामध्ये राज्य सरकारला हस्तक्षेप करता येणार नाही अशी बाब राज्याचे…
-
सन 2026 या वर्षातील शाळांना सुट्टीची यादी ( दिवाळी , उन्हाळी , इतर सार्वजनिक ) ; पाहा सविस्तर !

Spread the love@marathiprasar चंदना पवार प्रतिनिधी [ List of school holidays for the year 2026 (Diwali, Summer, Other Public); See details.. ] : सन 2026 या वर्षातील शाळांना सुट्टीची यादी अप्पर आयुक्त आ.विकास विभाग नाशिक मार्फत जाहीर करण्यात आलेली आहे . सविस्तर यादी पुढीलप्रमाणे पाहु शकता . उन्हाळी सुट्टी ( दिर्घ सुट्टी ) : दिनांक…
-
हिवाळी अधिवेशनांमुळे दि.13 व 14 डिसेंबर 2025 ची सुट्टी रद्द ; कार्यालये पुर्ण क्षमतेने सुरु ठेवण्याचे परिपत्रक .

Spread the love@marathiprasar चंदना पवार प्रतिनिधी [ Holidays on 13th and 14th December 2025 cancelled due to winter sessions ] : हिवाळी अधिवेशनांमुळे दिनांक 13 व 14 डिसेंबर 2025 रोजीची सुट्टी रद्द करण्यात आली असून , सदर दिवशी पुर्ण क्षमतेने कार्यालये सुरु ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . याबाबत शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत…